लेबल

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

कविता दिवस

 #कविता दिवस..


मुळाक्षरांनी गिरवित पाट्या,

नव-प्रतिभेची उंची ल्यावी;


मात्रांशी त्या सलगी होता,

शब्दमेघांची दाटी व्हावी;


या मेघांना फुंकर मिळता,

भावलहर ती बरसून जावी;


या धारांच्या शिडकाव्याने,

मने मनेही गंधित व्हावी;


त्या गंधाची धूंदी चढता,

ह्रृद्य कविता फुलून यावी; 


कवितेची मग सरिता होऊन,

मनामनांतून धावत जावी;


सुखेनैव हर तीत डुंबता,

दु:खे सगळी दूर सरावी...


©️ अर्चना खिस्ती - गोरकर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा