एका बॅगची तुटलेली चेन बसवायला टाकली होती. एका तासात देईन म्हणाला. अडीच तासानंतर गेले तरी झालेली नव्हती. 'अहो ते आधी होते त्यांनी 1 तासात देतो असे सांगितले होते आता परत एक तासाने कुठे येऊ मी?"मी जरा रागवूनच विचारले. तो शांतपणे म्हणाला,"बरं ताई,10 मिनिट थांबा. लगेच लावून देतो." मी थांबले. तेवढ्यात समोरचा कारवाला reverse टाकायला लागला. माझ्या कपाळाला पुन्हा आठी. कारण हातात purse आणि एक भाजीची पिशवी घेऊन मला ती गाडी पटकन सरकवता येईना. परंतु पुन्हा हा शांत बाबा,"दादा, गाडी आहे मागे. जरा थांबा."!!🙄
मी गाडी लावली. पिशव्या ठेवल्या. आणि त्या शांतीबाबाचे काम बघत उभे राहिले. त्याने काम छान समजावले. ही चेन हे runner. चेन चांगली आहे त्यामुळे फक्त runner बदलले. त्यामुळे 20 रू होतील. मी हातात आल्या त्या दोन्ही नोटा त्याला देऊ केल्या ते तीस रुपये होते. तो 10 परत देऊ लागला. मी त्याला म्हटलं तुम्ही एवढं छान बोललात. खूप शिकायला मिळालं. त्यामुळे राहू द्या ते पैसे. आजूबाजूला खूप बॅग होत्या. म्हटलं याच्या पण चेन लावणार का?. "त्या लावून झाल्यात ताई. कुणी न्यायालाच नाही आले. असं असतं बघा. जे काम होतं ते न्यायला येत नाही आणि ज्यांचं राहतं ते येऊन घाई करतात." 😊
समोरचा कसाही बोलला तरी आपलं बोलणं ही त्याची reaction नसावी. किती मनावर ताबा होता त्याचा! आता सांगा बरं श्रीमंत कोण? छान परिटघडीतले कपडे घालून पर्स वागवत गाडीवर फिरणारी मी की हा रस्त्यावर प्रदूषण, उकाड्यात बसलेला मळक्या कपड्यातला तुटक्या बॅगना नवजीवन देणारा थंड डोक्याचा शांती बाबा?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा