सगुण रूप तुझे देवा मोहवी मनाला
अंतरंगी रंगून जाता गातो मी भजनाला ....
नयनात रूप तुझे काशाय वस्त्रधारी
पादुकांवर स्थिर माझे चंचल मन भारी
नित्य नमन माझे या पावन चरणाला
अंतरंगी रंगून जाता गातो मी भजनाला.....
त्रिगुण तुझे ठाई शांत स्थिर झाले
हास्य मंद मुखी या सदा विलसले
नित्य नमन माझे या शांत मुखकमलाला
अंतरंगी रंगून जाता गातो मी भजनला...
गोमाता शुभ्र कांती पाहे वात्सल्ये वळूनी
श्वान चार हे दिसती पदी जातात रमुनी
नित्य नमन माझे या दया सागराला
अंतरंगी रंगून जाता गातो मी भजनाला...
किती वर्णावे तुला तुझी त्रिखंडात कीर्ती
करुणा ज्ञान वैराग्याची तू साक्षात मूर्ती
नित्य नमन माझे या ब्रह्मांडनायकाला
अंतरंगी रंगून जाता गातो मी भजनाला....
सगुण रूप तुझे देवा मोहवी मनाला
अंतरंगी रंगून जाता गातो मी भजनाला....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा