कुठले हे नाते?
ते तर असते हळवे उत्कट
तरीही खंबीर भक्कम बळकट।
कोवळ्या क्षणात होते कातर
संकटसमयी तेच धुरंधर।।
अथांग गहिरे तरी उत्तुंग
शांत गभीर कधी अवखळ रंग।
चमचमते जे सतेज हिरवे
मोरपिशी कधी श्यामल बरवे।।
राग-लोभ अन् रुसवे-खटके
वरवरचे पापुद्रे लटके।
अंतरी निर्मळ स्नेहमयी झरे
रुक्ष शुष्कता मुळी नच उरे।।
मुक्तपणाचे अतूट बंधन
ऊर्जेचे बघ भवती कोंदण।
सौहार्दाचा स्रोत निरंतर
मैत्र जिवांचे नित्य मनोहर।।
--©आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा