धुंद होती हवा
मंद होता वारा
भुरभुरणाऱ्या पावसात
किंचितसा गारवा....
हात माझा सखया
हाती तुझ्या होता
जन्मांतरीच्या वचनाला
सूर्य साक्षी होता..
उधळला गुलाल त्याने
हर्षून दशदिशांना
पाहूनी तो सोहळा
जीव माझा भाळला...
पाहून प्रीतीस आपुल्या
सागरास आले भरते
उसळत्या लाटांत तेव्हा
मी चिंब नाहीले होते...
घेतलेस कवेत जेंव्हा
क्षणभर मी थरथरले
परतीची घटीका आली
शुभ्र थवे सांगून गेले...
रम्य होते दिवस ते
वाळुसम निसटून गेले
धुंद परिमळ परि ते
मनात सोडून गेले....
कवयित्री : सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर
कोळथरे; दापोली
9420745288
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा