" रे पावसा "
रे पावसा....
तूझ्या हजार तरी अदा!
अन तुझ्यासवे
मनाच्या कित्येक तरी छटा !!
बरसतोस खरा
आणि विखुरतोस मला
चिंब तुडुंब
भुर भुर मुसळधार
उतरत जातो कागदावर हळुवार!
सोडून येतोस शब्दांच्या पल्याड
आठवणीत रेंगाळायला लावतोस फार
रे पावसा....
तेव्हा कासावीसतो प्राण
रे पावसा....
तुझ्या हजार तरी अदा
चुकवतोस काळजाचा ठोका
आणि हजारदा तरी हिंदोळा!
रे पावसा ...
रे पावसा ...
#स्वरूपा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा