लेबल

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

मैत्री

 मैत्री 

===


अस्तित्वाने दिलेलं व्यक्तित्व जिथे निर्भीडपणे व्यक्त करता येतं 

ते नातं म्हणजे मैत्री !!


अतिकठीण समयी नियतीचा राग आला असता नियंत्याच्या ही आधी जे स्मरतं 

ते नातं म्हणजे मैत्री !!


अहो ह्या नात्याचा महिमा किती सांगावा? 

खुद्द सर्वसमर्थ गिरिधरानेही सुदाम्यासव जे जपलं आणि जोपासलं 

ते नातं म्हणजे मैत्री !!


सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचे -

माझ्या ह्या मुक्तपणे व्यक्त होण्याला प्रोत्साहित करणारा,

खूप परिचित नसूनही ऋणानुबंधांनी बांधला गेलेला 'प्रबोधिनी पालक लेखनाचा' हा गट म्हणजेच मैत्री!!


- ©ज्ञानेश्वर नेरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा