लेबल

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

एक छोटी पणती

 एक छोटी पणती.. विचार करते की मला सगळा परिसर प्रकाशमय करायचा आहे.. मी तर सूर्य नाही... पण म्हणून मी थांबू शकत नाही. मग मनात ठरवून सगळ्या दिव्यांना, पणात्यांना आणि आकाश कंदीलांना विचारते की याल का माझ्याबरोबर. तर दिवा म्हणतो तिला आपण काहीही केलं तरी सूर्यासारखा प्रकाश नाही देऊ शकत. पणती एक क्षण विचारात पडली पण पुढच्याच क्षणी म्हणाली की सूर्याशी स्पर्धा कशाला.. आपण सगळा परिसर आपल्याकडे आहे त्या प्रकाशाने व आनंदाने उजळवून तेजोमय करून रात्रीचं एक देखणं रूप  सगळ्यांना दाखवू.. 


ह्या दिवाळीला आपली पणती असो किंवा दिवा किंवा आकाशकंदील .. प्रकाशमान होऊ या.. अंधकाराला तेजाचे नवीन रूप देऊ या.. 


दिपावलीच्या सर्वांना झ हार्दिक शुभेच्छा.. 🎉🎉🎉


शुभेच्छुक :- 

सिद्धी होमिओ फार्मसी


श्री. व सौ. हर्षाली सत्यवान वाघोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा