लेबल

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

पहिली दिवाळी

 पहिली दिवाळी.


हुश..मिळाली बाई एकदाची बस..सामानाच्या बॅग्स बसच्या वरच्या खणात ठेवता ठेवता तिने निःश्वास सोडला.

एरवी शनिवारी सकाळी साडेसहाला मोकळा ढाकळा आणि निवांत असणारा दादर पुणे बस स्टँड आज गर्दीने फुलून वाहिला होता.. खांद्या वरच्या bags सांभाळत तास भर रांगेत थांबून तिने तिकीट मिळवलं तेव्हा सकाळच्या मंद गारव्यात ही ती घामाघूम झाली होती.

शेवटी एकदाची ड्रायव्हरने बसची किल्ली फिरवली...जागे होऊन रस्त्यावर उतरलेल्या मुंबई करांच्या गर्दीतून वाट शोधत बस निघाली. खिडकीतून आत येणारा वारा आल्हाद दायी होता.  गाडीने वेग घेतला खरा पण तिच मन त्याहून जास्त वेगात धावू पाहत होत.

----------------

दिवाळीच्या दिवसात आई chya  हाताला आणि पाया ना ही उसंत नसायची..महिना दोन महिना आधीच तिच्याकडे शिवणाचे गठ्ठे येऊन पडायचे..अगदी आजी बाईंच्या सुती नववारी पासून रेशमी, जरी..इरकली..पैठणी पर्यंत. सा ड्यांचे विविध पोत ती हाताळायची. त्या नव्या करकरीत साड्यांना फॉल पिको करायची..प्रत्येकीला रुचेल सजेल असे ब्लाऊज शिवून द्यायची..

पैठणी हाताखाली आली की ती विशेष काळजीपूर्वक हाताळत असे. 'महावस्त्र' असतं ते.. ती म्हणायची कायम.. 

ते  महावस्त्र तिच्यावर कधी  सजू शकले नाही याची तिच्या हून जास्त खंत बाबा ना  वाटे.  पण  हीच  आपल सतत एकच  पालुपद.. 'आपल्या मुलीने शिक्षणाचे महावस्त्र  ल्याले म्हणजे मी जरतारी चा मोर मिरवल्या सारखच आहे..'

---------------

आई ची  सय येऊन ती एकदम  हळवी झाली.  तिला वाटल ताबडतोब फोन करावा..' फोन वर गळ्यात पडायची सोय आहे का पण .. ? 'आईच्या  तोंडाची  वाक्य  तिला मागच्या आठ नऊ  महिन्यात  पाठ झाली होती.. 


आणि  बाबा..

त्याच्या हातचा बुंदी लाडू माझी  आठवण काढत  असेल ... आणि चकलीच तिखट मीठ मी  टेस्ट न करता  हा  चकली करूच  कशी शकतो .. चांगली भांडणार आहे आता मी गेलेकी .. तिने लटक्या रागाने नाक उडवल.. 

.. 

बाबांची नोकरी गेल्यापासून  आई  हिमतीने आपला शिवण उद्योग वाढवत होती...  बाबा नी एका दिवाळीला तिला  मदत म्हणून फराळ बनवायला सुरूवात  केली खरी पण लवकरच त्यानी त्याचा ताबा घेतला आणि बाबाच्या हातची चव आईच्या स्त्री ग्राहका पासून फार लपू  शकली नाही. 


त्या दोघांचे कष्ट तिच्या पाठीशी उभे राहिले होते आणि  आजच्या दिवसाच्या ही .. !

----------

स्टेशन पासून किती लांब  आहे  आपल घर ! ती आता अगदी अधीर झाली होती...

----------

बाबांच्या हातात तिने  आईच्या आवडीची मोर कंठी रंगाची भरजरी पैठणी ठेवली आणि बाबानी ती अलगद आईच्या खांद्यावर ! तिची स्वकमाई ची पहिली दिवाळी तिच्या घरात तेजोमय झाली होती !! लेकीच्या  शिक्षणाच्या महावस्त्राने बाबांचे स्वप्न आईला भेट दिले  होते !!!


रुपाली कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा