लेबल

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

मळभ

 “ काय झालं ? तुझा चेहरा आज असा का दिसतोय?”

” काही नाही रे…”

” नाही कसं ? काय झालंय...बोल  ..”


आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं..

हेच.. हेच ते हक्काचं ठिकाण.. Your Own Happy Place !!


फक्त आठवून बघा अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत ?? मनाला उभारी , खराखुरा विसावा देणारी .. एक एक आठवा.... एकदम फ्रेश वाटेल !! 

त्या व्यक्तींसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील..

कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसलं जातं , भावा सोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी..तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा… sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं !!


निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं.. मन हलकं हलकं होऊन जातं.. अगदी मोरपिसासारखं !!

तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो.. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं… कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलं जातंच पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केलं जात नाही ! आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत.. मन मोकळं वाटतं..


अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपूssssन ठेवायला हवीत... हिऱ्या माणकां पेक्षा जास्त !! ती हरवायला नकोत,आयुष्याच्या गडबडीत... कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची !! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी...


म्हणूनच “तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं” हे त्यांना नक्की सांगायालाच हवं.....


चला तर मग , वेळ न घालवता लागा कामाला .....

©® 💝भाग्यश्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा