#Thoughtful write ups ✍️
"स्वतः लिहा तुमच्या आयुष्याची स्क्रिप्ट"
स्वसंस्कार- Pygmalion Effect-Part 2
- डॉ. योजना चिराग,
🔅"ती आली तिने बघितलं आणि तिने जिंकलं"🔅 असंच खरंच झालं त्या दिवशी.तसेच प्रभावशाली व्यक्तिमत्व तिने खुप कष्टाने मिळवले होते.
ती ने बहुतेक बरंच वजन कमी केलं होतं, केसांची काहीतरी ट्रीटमेंट केली होती, साडी सोडून अतिशय ट्रेंडी पण सुंदर असा ड्रेस घातला होता,
ह्याचे विशेष नाही पण तिच्या हालचालीतून आत्मविश्वास साफ जाणवत होता, मन शांत आणि जीवन settle झाल्याची निश्चिन्तता ही तिच्या कडे बघून जाणवत होते,आणि mindfully ती क्लिनिक waiting room मध्ये हातातील आरोग्य लेख मासिक वाचत बसली होती . 😊
अपर्णा इतक्या वर्षानी भेटायला येतेय याची उत्कंठा मला नक्कीच खुप होती अपर्णा
2014 मध्ये माझ्याकडे ट्रीटमेंट घेत होती.
"मॅम पुण्यात आले होते तर तुम्हाला न भेटता जाणे शक्य नाही,"🙏🏻😊
तिने आणलेले गिफ्ट मला हातात देत न बोलता कृतज्ञता व्यक्त केली.
मीही खुप आनंदात आणि कौतुकाने तिच्याकडे बघत तिला विचारले अगं राणी तू सध्या कुठे असतें काय करतेस?
मॅम आपले बोलणे सेशन्स आणि ट्रीटमेंट एक वर्षे पुर्ण करून मी तुम्हाला तेव्हा सांगितले ही होते कि मी home science साठी मद्रास युनिव्हर्सिटी ची entrance दिली आणि सिलेक्ट झाले. मॅम जीव ओतून अभ्यास प्रॅक्टिस केली.
परीक्षा तर pass झाले. आपण सेशन मध्ये जे जे बोललात, जो प्लॅन आपण ठरवला आणि स्वतः ला बदलायचे ठरवले Psychology scientific way ने.
मग मागे वळून नाही पहिले आणि education loan आणि scholarship वर तिथेच मध्ये पुढचे शिक्षण घेतले आणि सध्या Bangalore मध्ये एका food chain industry मध्ये जॉब करतेय.
कंपनी च्या एका ब्रँच ची मी सर्वेसर्वा आहे.
आणि स्वतः वर काम करून बरेच skills develope केले, रोजचे diet schedule, व्यायाम,ध्यान आणि self affirmations आयुष्यभरासाठी माझा दिनक्रम बनवला, आहे. संकट खुप आले अडचणी आल्या पण एकदा स्वतः ठरविले , कि मी खरं च नक्की काय आहे ?हे मला तरी कळू दे.... मग थांबले नाही.
बाबा मागच्या वर्षी गेले आई ला बरोबर घेऊन Bangalore मधेच राहत आहे बोलली."
मला किती आनंद झाला असेल हे सगळं ऐकून हे मी इथे शब्दात नाही सांगू शकत 😊
जसा अपर्णा ला बदलायला मी जीव ओतून काम केले होते session मध्ये तसें माझ्या सर्वच patient साठी करते नेहमीच मी. पण session मध्ये मी दिलेली माहिती त्यांना त्यांच्या problem मधून बाहेर नाही काढत , तर त्यांनी बदला साठी उचललेली त्यांची पाऊले, actions त्यांना यातून बाहेर काढतात. तर त्या काही action takers पैकी ही एक कर्मसिद्धीका च म्हणावी... ☺️
माझ्या कडे आली तेव्हा 29 वयात प्रचंड migrain, वाढलेला bloodpressure, obesity आणि palmar eczema घेऊन 2014 मध्ये अपर्णा माझ्याकडे होमिओपॅथीक घ्यायला आली होती.
आई वडील यांनी संबंध तोडलेला, love marriage केलेले. खुप वाईट असा unsuccessful वेदनादायी लग्नाचा अनुभव घेतलेला, प्रकरण शारीरिक अत्याचार पर्यंत गेलेला,प्रचंड मानसिक त्रास, आणि पुर्ण कोसळलेला आत्मविश्वास.कित्येक रात्री झोप नाही, आणि डिवोर्स घेतला होता नुकताच. असं सगळं अवघड च असलेलं आयुष्य तिच....
शारीरिक आजार होमिओपॅथी औषधानी आणि मानसिक व्यवस्थापन काही stress management REBT सेशन्स नीं केले होते अपर्णाचे त्यावेळेस.
तिला स्वतः ची डबघाईला गेलेली स्वप्रतिमा उंचावण्या वर भर दिला, तिच्या तल्या potential आणि तिचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला.
तिला स्वतः चा स्वीकार, स्वतः वर विश्वास आणि स्वतः वर काम करण्याची प्रेरणा मी माझ्या session द्वारे केली.
मात्र अपर्णा ने नुसती माहिती ऐकली नाही तर action घेतली, पाऊल उचलले आणि स्वतः वर खरंच काम केले. आणि आज ती ने स्वतः च्या जीवनात 360°डिग्री turn केले ते त्याचेच फळ आहे 😊
तुम्ही सगळे म्हणाल आज आपण Pygmalion Effect part 2 पाहणार होतो.
तर हो...अपर्णा हे Pygmalion effect चे जितेजागते उदाहरण आहे.हे पुढील लेख वाचताना तुमच्या लक्षात येईल.
अशी अनेक उदाहणं आहेत जसेतापट वडिलांच्या स्वभावा मुळे अक्षरशः कोमेजलेला आत्मविश्वास आणि हरवलेले चैतन्य परत मिळवून स्वतः आता एका मोठ्या फॅक्टरी चे मालक असलेले अनिरुद्ध ही या pygmalion effect on our own self चेच उदाहरण आहे.
अशी खुप वेगवेगळी मोठ्या लोकांची आणि लहान मुलांचीही उदाहरणे आहेत सांगायला,
पण काही उदाहरणं आपल्या कायम मनात कोरून घर करून राहतात त्यातलं हे एक आहे. आपल्या कामाचे, proffession चे मला 200% समाधान देणारी उदाहरणे.
तर मागच्या भागात आपण Pygmalion effect चा लहान कोवळ्या बालकावंर होणारे positive आणि negative परिणाम बघितले.
ह्या part मध्ये आपण Pygmalion effect चा Positive परिणाम तोही
चार वेगवेगळ्या क्षेत्रात बघणार आहोत.
1) Pygmalion effect on kids - जे आपण बघितले
2) Pygmalion Effect on our own Self
3) Pygmalion effect on Our Relationships
4) Pygmalion Effect on our Business and success*
आपण बघितले Pygmalion effect म्हणजेच
'Expectations from others influence our performance or Achievements.'
तसेच मग
"expectations from our own selves make our own successful "
आपल्या जीवनात सगळ्यां क्षेत्रात सगळ्यां phases मध्ये ह्या इफेक्ट चा आपल्याला सामना करावाच लागतो. त्याने आपण यश किंवा अपयश मिळवणार हे ठरते.
पण सर्वात महत्वाचे आहे
🔅🔅I) Pygmalion effect on ourself ➡️🔅🔅
स्वसंस्कार⏭
जर दुसऱ्यांनी आपल्या कडून काही अपेक्षा केली आपल्याला प्रोत्साहन दिले तर आपण चांगला performance करतो. असे असेल तर आपण ह्या effect ची खरी power विसरतोय. ती म्हणजेच
आपली आपल्या स्वतः कडून केलेली अपेक्षा, आपल्या स्वतः ची सुधारलेली स्वप्रतिमा, आपल्या स्वतः ला आपण दिलेले प्रोत्साहन हे काय मॅजिक करू शकते ते आपण वर अपर्णा च्या उदाहरणात पहिले.
आपण बघूया कि pygmalion effect च्या मदतीने कसे आयुष्यात success मिळवू शकतो.
जेव्हा आपण लहान बालक होतो तेव्हा आपल्या हातात नव्हते कि कोण आपल्याला कमी लेखेल, आपल्यात गुणवत्ता किंवा बुद्धिमत्ता च मुळी कमी आहे आपण बावळट च आहोत किंवा आपण वेंधळे मूर्ख आहोत असे कोणी ही आपल्याला बोलले तर लहान असताना आपण ते खरं मानून आपल्याला कमी समजून खचून जायचो आणि
स्वप्रतिमा च तशी करून घेऊन त्याप्रमाणेच प्रयत्न करायचे सोडून द्यायचे आणि अपयश हाती येण्याची शृंखला च जणू बनायची.
आपण जी तोडू नाही शकयचो. हतबल पणे सगळे आपल्या सोबत आपल्या अनाहुत पणे घडत जायचे आपण थांबवू नाही शकायचो.
परंतु मोठे झाल्यावर आपली समज ज्ञान आपल्याला आल्यावर काय चूक काय बरोबर कळाल्यावर आपण आपल्याला बदलू शकतो.
नक्कीच हे समजू शकतं.
फक्त ती जाणीव करून द्यायला हवी कोणीतरी नसेल कोणी तर स्वतः ला वाटले पाहिजे आपणच ही अपयशाची किंवा self inferiority complex ची साखळी मोडूयात आता.
कोणी आपल्याला उगीचच blame दोष देत असेल आपली संपूर्ण personality च मुळात सदोष आहे असे proove करत असेल. किंवा तुझ्यात कसा काही अर्थ नाही, तुझे कसे काहीच होऊ शकत नाही, किंवा तुझ्यात कसे काहीच चांगले नाही,दुसरे आपल्यापेक्षा किती हुशार आणि impressive आहे असे वारंवार कोणी आपल्याला कमीपणा Criticism देत असेल तर ..... कधीतरी थांबून स्वतः विचार करायला हवा कि हे खरंय का???? माझ्यात काहीच क्षमता नाहीत का? मी कशातच धड नाही का? खरंच मी इतकी किंवा इतका अर्थहीन आहे का???
नीट सदसदविवेक बुद्धीने विचार केलात तर नक्की कळेल कि नाही.... नाही असे मुळीच नाही कितीतरी चांगल्या गोष्टी माझ्यात आहेत,मीबऱ्याच चांगल्या पद्धतीने करू शकते. दुसऱ्यानीं दिलेली self emage मी स्वतः ला घालून घेतली आणि प्रयत्न च केले नाहीत स्वतःला बदलायचे तर मी माझ्या आयुष्याचे control दुसऱ्यांना देतेय, ते मी घेईल आणि स्वतःचे प्रतिबिंब आता मी ठरवेल आणि ते प्रयत्नपूर्वक बदलेल ☺️👍
परंतु या विचारापर्यंत चा प्रवास मात्र व्हायला हवा तर च बदल नक्की शक्य आहे.
माझ्यावर विश्वास ठेवा या मॅजिकल Pygmalion effect ने आपले आयुष्य 90°,180° किंवा पुर्ण 360° turn करणे शक्य आहे.
मी कित्येक cases बघितल्या आणि आजूबाजूला घडताना नही ही बघतच आलीये 😊😊
गरज असतें एकदा दुसऱ्यांनी वर्षानुवर्षे मांडलेला जबरदस्तीचा डाव मोडून नव्या उमेदीने नवा डाव मांडण्याची इच्छा असण्याची त्याची तयारी करण्याची आणि नंतर तो डाव जिंकण्याची....
तर आपली स्वप्रतिमा बनवण्यासाठी स्वतः च्या अंगीची गुण, मूल्य, आणि क्षमता समजावून घेऊन त्यात गरजेप्रमाणे बदल करून च ह्याची सुरुवात होते.
आपलीच आपल्याकडून अपेक्षा, प्रोत्साहन म्हणजेच pygmalion effect आपल्याला उच्च ध्येय साध्य करायला आता मदत करणार आहे.
कसे? शास्त्रीय Psychology aspect ने बघूया नुसते मोघम बोलून उपयोग नाही.
आपल्यावर पेपर पेन घेऊन काम करायचे आहे..... जणू आपले स्क्रिप्ट आपण च लिहायला घ्यायचे.
कोण करते आपल्या साठी pygmalion effect तर
A)↔️ The Four experience - म्हणजेच स्वतः चे अगोदर चे अनुभव
आपला confidence आणि passion वाढवितात हे अनुभव.
आपल्या success आणि आत्मविश्वास वाढवत जाण्यासाठी
4 meaningful experience शोधून त्यावर काम केले तर definite यश मिळवतच जाणार.
↔️1) Mastery experience -* आपण वर पहिले तसें भीतीवर मात मिळवून mastery मिळविलेले experience आपल्यावर pygmalion effect करतात आणि यश मिळतं राहते.
उदा. जर आपल्याला उंच जागांची, उंचीची खुप भीती आहे. किंवा पाण्याची खुप भीती आहे.
तरी तुम्ही धीर, बळ एकवटून swimming शिकायचे ठरवले पाण्यात उडी मारली आणि पोहायला पण शिकलात तर हळू हळू पाण्याची भीती गेली आणि काही काळातच तुम्ही चांगले swimmer बनलात.
किंवा उंच जागांची भीती असताना एकदा तुम्ही sky diving केले आणि हळू हळू ती भीती गेली आणि आता सराईत पणे नेहमीच sky diving करू लागलात आणि विसरून ही गेलात नंतर कि तुम्हाला उंच जागेची, पाण्याची भीती होती म्हणून.
म्हणजे बघा काय झाले इथे कि तुम्ही धीर ठेवून तुमची भीती घालविली आणि आता अजून पुढे शिकून प्रयत्न केलात, यश मिळवले,अजून पुढे स्वतः कडून अपेक्षा करत गेलात आणि अजून यश मिळवत गेलात, अजून स्वतः ला प्रोत्साहन देत गेलात आणि त्या क्षेत्रात यश बक्षीस किंवा नैपून्य मिळविले.... झाला pygmalion effect 🥇🥇🏆🏆
आठवतेय ना सगळ्यांना आपण मागच्या लेखात बघितले होते कि 40 पैकी 10 मुलांना जसे शिक्षकां कडून प्रोत्साहन,उत्तेजना आणि विश्वास दिल्याने त्यांचा परफॉर्मन्स खुप उल्लेखनीय झाला यश मिळाले आणि त्यांचा स्वतः वरचा आत्मविश्वास वाढला आणि व्यक्तिमत्व च तजेलदार चमकदार झाले आणि त्यांच्या Brain मधील neurons मधेही अमुलाग्र positive बदल झाला.....
Same तसा pygmalion effect आपण स्वतः वर स्वप्रयत्नानी केला.
नीट चेक केले तर हे सगळे बदल आपल्यात ही झाले.
आपण आपल्या प्रत्येक वयात, क्षेत्रात आणि प्रत्येक phase मध्ये हे आपल्यावर कधीही करू शकतो.
उदा. आपल्याला कशाची तरी भीती tension असते जसे कि-
- एखाद्याला नवीन जॉब चे खुप टेन्शन असेल, -एखाद्या लापहिल्यांदा फ्लॅट घेण्याच्या,
-loan काढून ते परत फेड करण्याचे, -एखाद्याला कुठली मोठी खरेदी,
-कोणाला नवा business टाकण्याची,
-किंवा अगदी एखादे भाषण कुठे पहिल्यांदा च करायचे असेल,
-किंवा अगदी एखाद्या नव्याने आई बनलेल्या मातेला , सून, बायको बनलेल्या नववधुला, एखाद्या गृहिणीला मोठ्या जेवणाच्या तयारीचे,
-मोठ्या पार्टीच्या आयोजनाचे..... असे कुठल्याही गोष्टी पहिल्यान्दा करताना प्रचंड तणाव येऊ शकतो, भीती वाटू शकते....
पण जर स्वतः ला प्रोत्साहन देत, स्वतः वर विश्वास ठेवून तयारी केली आणि भीतीवर मात मिळविली तर नक्की कृती चांगली होते आणि.... स्वतः वरचा विश्वास वाढतो....मग पुढचे challenge घेतले जाते, यश मिळते मग अजून पुढे.... अजून पुढे....यश संपादन करत जातो आणि यशस्वी होतो स्वतः च्या pygmalion effect ने 👍😊
सर्वात महत्वाचे ➡️
*एका कृती ची भीती गेली काम नीट झाले कि पुढचे परिश्रम मग पुढच्या पातळीवरचे यश मिळते.... मग जरा थांबायचे आपल्या abilities आपल्या capabilities आणि आपले श्रम यात मेळ घालून self realization मध्ये जाऊन पुढची स्वतः साठीची रूपरेषा आपणच एखायची.... त्यावर पाऊले टाकत.... पुढे.... पुढे.... आयुष्याच्या पटावर मुक्त भ्रमंती करायची, स्वतः च्या च मस्तीत, दुसऱ्यां ना न दुखावता, दुसऱ्या व्यक्तीला, घटनेला किंवा परिस्थितीला दोष किंवा blame जराही न देता..... वाह! स्वतः च्या हाताने स्वतः च्या जीवन पटाची स्क्रिप्ट लिहिण्यासारखे च जणू..... 😊😊
↔️2) Vicarious Experience -
हे अनुभव खुप मदत करतात स्वतः ला प्रोत्साहित करायला pygmalion effect आपल्यावर समृद्ध करायला.
Vicarious अनुभव म्हणजे दुसऱ्यांचे यश मिळवतानाची दृश्य अनुभव करणे..... जसे आपली team क्रिकेट match जिंकलेला क्षण,
कोणाला तरी स्पर्धेत गाण्यात, नृत्यात, लेखनात, ऑफीस मध्ये, टीव्ही मध्ये विजेता झालेले बक्षीस टाळ्या मिळालेले असे क्षण आपल्याला तसें यश मिळावायला प्रोत्साहित करतात...त्यांचे यश बघून आपणही यश मिळवण्याच्या process चा विचार करतो.आणि visualise करतो
↔️3) Modeling experiences - आपल्या Role मॉडेल किंवा Mentor कडून शिकणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष.
या अनुभवानी आपण आपले purpose आणि उद्देश शोधतो करत आपले role मॉडेल ऑलरेडी यशस्वी आणि योग्य दिशेने चालू असतें.
*
↔️4) All other Emotional and Physical Experiences - हे जे आपण रोज आपल्या आयुष्यात घेत च असतो त्यावर नीट लक्ष ठेवले तर त्यातून आपण आपल्याला नेहमीच प्रेरित करतो.
ह्या सगळ्यां catogory आपल्याला तेव्हाच मदत करतील जेव्हा आपण comfort zone मधून बाहेर येऊ आणि आपल्या आयुष्याची पुनःरचना करायचे ठरवू. हे ब्रीदवाक्य समजा.... 👍😊
B)आपले self Descipline Dedication ↔️
आपल्या शरीरावर मनावर समृद्धीपणे शास्रशुद्ध पणे सातत्याने काम करायचे.
जसे
1)रेगुलर व्यायाम
2) योग्य आहार
3) ध्यान आणि self affirmations प्रॅक्टिस
4) मानसिक व्यवस्थापन वर वाचन करा माहिती मिळावा किंवा शिकून घ्या.
स्वतः चे व्यक्तिमत्व Mentally Resilient बनवायचे प्रयत्नपूर्वक... सातत्याने प्रयत्न करून
आता बघूया नात्यांमध्ये pygmalion effect कसा काम करते.
🔅🔅II) Pygmalion effect on Relationship -🔅🔅
लक्ष देऊन वाचा,आपल्या स्वतः चा स्वतः वर किंवा दुसऱ्याचा आपल्यावर तसेच आपला दुसऱ्यावर positive किंवा negative pygmalion effect होणारच ना...
म्हणजे बायको जर नवऱ्याला बोलत असेल किंवा indirect पोहोचवत असेल, कि तुम्ही खुप चांगले व्यक्ति आहात, चांगले human being आहात, हुशार आहात, आमची किती काळजी घेता, कष्टाळू आहात मला तुमचा अभिमान वाटतो, तर पती त्याप्रमाणे behave करण्याचे chances किती तरी जास्त आहेत.... शास्र सांगते न आता आपण पहिले 🙂 तशी त्यांची स्वप्रतिमा selfemage बनते responsible caring husband ची
तसेच नवरा पत्नी चे कौतुक करेल तिच्यातील कला गुणांना appreciate करत असेल, तिला आदर देत असेल directly आणि indirectly, तिला प्रोत्साहन देत असेल हे शिकून घे, ते skill अवगत करून घे, मी मदत करतो, तू हुशार आहेस, समजूतदार आहेस, सगळे चढ उतार तुझ्या मदतीने किती easily पार पाडले, तू छान आहेस... असे जर संवाद असतील अगदी मनोभावे बरं... वरवर नाहीच... आतून... तर तसेच positive स्वप्रतिमा त्या दोघांची ही बनेल आणि relation मध्ये किती गोडवा आणि समंजस्य आदर असेल...
असेच होते बाकी नात्यांच्या बाबतीत...
🔅🔅III)↔️ Pygmalion effect for Business and Success and leadership ↔️🔅🔅
आपल्या लक्षात आलेच असेल जर business करायचंय तर खुप लोकांशी संपर्क येणार, कंपनी असेल तर आपले कर्मचारी, सर्वांवर positive pygmalion effect आपण देऊ शकतो.
"तू चांगले काम करतोस, तू व्यवस्थित आहेस, खरंच कष्टाळू आहेस, जर खरंच चांगले असेल तर तू अतिशय impressive काम आहे " असे बोलून, indirectly gesture देऊन waves पोहोचतात.
आपण boss चे लाडके आहोत तर अजून चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळते, अजून चांगले काम होते.... अजून पुढे.... अजून पुढे... त्याच्या आणि directly तुमच्या यशाची शृंखाला बनते...😊
चांगली स्वप्रतिमा दिली तर खात्रीने लोक चांगलेच काम करतील आणि तुमचा business चांगला grow होण्याचे chances कित्येक पटीने वाढतात.
तुम्हाला सांगू जास्त कोणी नाही आपल्या घरी येतात रोज त्या कामवाल्या मावशीना असा positive pygmalion effect देऊन बघा तर खरं... घर कसं, भांडी कशी, लख्ख चकाकेल आणि स्वयंपाकाला असतील तर चव कशी वाढेल जेवणाची.... आणि ते झाले कामाचे... तुमच्या वर जीव, विश्वास, आणि मर्जी अशी जडते कि ते घर तुमचे नाही तिचे असल्यासारखे ती वागेल, तुम्हाला सोडून जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.
तू खरंच छान काम करते, स्वच्छ असतं सगळं, अगदी घरच्या सारखी वाटते तू, बस ग जरा, थोडे माझ्यासोबत खा, चहा घे, तू उगीचच इकडे तिकडे करणारी नाही, इमाने इतबारे काम करते मला खरंच आवडत तुझं काम.... असं जरा बोलून indirectly दाखवून तर बघा (अर्थात ती खरंच जरा चांगली हवी 🙂)
माझा वैयक्तिक अनुभव सांगते मी आजतगायत जिथे जिथे क्लिनिक मध्ये वेगळ्या घरी अशा ज्या ज्या मावशी कामाला लावल्या त्यांच्याशी जिवाभावाचे नाते जडले, वर्षानुवर्षे माझ्याकडे त्याच मावशी आहेत.... अशी वेळ आहे कि मी काढेल तरी त्या जाणार नाहीत 😊😊
लोक बोलतात निवडून निवडून चांगल्या बायका तुला भेटतात 😊
आणि काम अगदी सुरेख स्वच्छ आणि घरात आल्या कि जणू positive waves आणि चैतन्य येत घरात रोज माझ्या....... एक दोन अनुभव असे आहेत कि मला शहर, ते घरं सोडत असेल तर मावशी emotional रडवेल्या झाल्या आणि पुन्हा फोन नंतरही ख्याली खुशाली चे फोन यायचे मला त्यांचे .... 😊 सांगण्याचे तात्पर्य relationship मधील pygmalion effect 😊
हा अनुभव रोजच्या मावशीचा असेल तर सगळ्यां सगळ्या क्षेत्रात असे बदल घडू शकतात नाही का??.... नक्की बदल घडविता ही येतात
आशा आहे आजचा ही pygmalion effect part 2 वाचकांना उपयुक्त माहिती देणारा, काहीतरी सूक्ष्म का होईना बदल घडवून आणणारा आणि स्वतः शी relate connect करणारा आणि शास्त्रीय माहिती देणारा असा वाटला असेल.
धन्यवाद 🙏🏻😊
डॉ योजना चिराग,
PG Homoeopath,
Sp, REBT, Psychology,
stress mangement,
Certified Covid Educatori.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा