लेबल

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

दिवाळी

 पार्थ : काय कटकट आहे आला अजून एक सण. सकाळी लवकर उठायचं. फराळाचंच खायचं. नुसता वैताग. कशाला हे सण येतात. सुट्टी सोडलं तर काय चांगलं आहे. मला बघायचंय यात काय चांगलं शोधतोस 

योगेश: अरे असं काय म्हणतोस पार्थ. किती उत्साह किती आनंद असतो दिवाळी म्हणलं की. आणि सण आपल्याला शिकवण्यासाठीच असतात त्यातून आपण काय शिकायचं हे ठरवायचं

पार्थ: योग्या दादा तू खूप आदर्श विचार करतोस . जरा नीट सांग ना तुला काय म्हणायचंय 

योगेश  : हे बघ, मी नरकचतुर्दशी दिवशी सकाळी लवकर उठून मी जेंव्हा पणती लावतो तेंव्हा त्या दिव्यासमोर मी माझ्यातील एक अज्ञान दूर करण्याची शपथ घेतो. आणि मग ठरवून एका विषयातील ज्ञान वाढवतो 

पार्थ : तरीच दादा तुला बऱ्याच विषयातील खूप माहिती आहे. आत्ता कळली संकल्पाची शक्ती.

योगेश : अरे आपण ठरवून करू शकतो 

पार्थ : दादा अजून सांग ना

योगेश : ऐक, लक्ष्मीपूजनाचा दिवा सांगतो , आपल्याला गरजे पुरतं ठेऊन उरलेले गरजू लोकांना दे. आणि मी तसंच वागायचं प्रयत्न करतो. याच बरोबरीनं अनावश्यक खर्च टाळण्याची आणि काय ‘खरं गरजेचं’ आहे हे बघण्याची सावधानता पण हा दिवा देतो.

पार्थ : वाह किती महत्वाचा विचार 

योगेश: पाडव्याचा दिवा प्रेरणा देतो , जे करीन त्यात १०० % कष्ट करायची . आणि आपल्या कष्टावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास ठेवण्याची. त्यामुळे कोणतेही काम आत्मविश्वासाने होते आणि त्यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते.

पार्थ : खरं आहे ...

योगेश: भाऊबीजेचा दिवा सांगतो, आजूबाजूला जे दुर्बल आहेत त्यांची कधीच चेष्टा उपेक्षा करू नकोस. जमलं तर त्यांना आधार दे आणि त्यांना सबळ होण्याची प्रेरणा दे.

पार्थ: दादा खरंच किती वेगळा विचार करतोस तू. मला अभिमान आहे तू माझा दादा आहेस. या दिवाळीत मी पण हीच प्रेरणा घेणार 

योगेश : मग प्रार्थना करूया त्या उर्जारूपी शक्तीला     

"तमसो मा ज्योतिर्गमय

कौस्तुभ सांभारे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा