लेबल

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

Happy Woman’s day special

 #Thoughtful Write-ups✍️ 


Happy Woman’s day special-

                 

               “तू खुद की खोज में निकल

                    तू किस लिए हताश है,

                      - डॉ योजना चिराग, 


       या आजच्या खंबीर, देखण्या, प्रभावी आणि प्रतिभावान अशा रणरागिणी ची,सावित्रीच्या लेकींची उंच भरारी बघता , खऱ्या अर्थाने सावित्रीबाई, महर्षीकर्वे, रमाबाई, ताराराणी, आणि आता अताच्या आपल्या सिंधुताई, सुधा मूर्ती सर्वांना अनांद समाधान च वाटत असेल हे दिवस बघून,त्यांच्या संघर्षाचे चीज झाले असे वाट त असेल त्यांना.


      तर आपण जागतिक महिला दिन साजरा करायला च पाहिजे,असा एक दिवस celebration करून न थांबता. आपण रोजच स्वतः च्या सुंदर आणि प्रभावी अस्तित्वा साठी करत्या करावीत्या ला मनोमन आभार मानूयात आणि रोज चा दिवस  साजरा करूयात.🙏😊


  गेल्या ५० वर्षांत स्त्रियांच्या आयुष्यात झपाट्याने बदल झाला. स्त्रिया आज मोठ्या संख्येने मध्यप्रवाहात आल्या आहेत व पुरुषांच्या जगात त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत झाल्या आहेत.


 याचा एक अर्थ नोकरी, उद्योग व्यवसायात स्त्री-पुरुष समता आली आहे. समाजाचा मुख्य प्रवाह हा आज केवळ पुरुषक्षेत्र उरलेला नाही. संख्येने तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्या तरी समाजाच्या विकासामध्ये नगण्य नक्कीच नाहीत.

कोणत्याही क्षेत्रात वरचे स्थान पटकावण्याची जेवढी संधी पुरुषांना आहे, तेवढीच स्त्रियांनाही (तत्त्वतः) आहे. ज्या लष्करी क्षेत्रात प्रत्यक्ष युद्धभूमीवर स्त्रियांना शिरकाव नव्हता, तिथे आज स्त्रियांची एक स्वतंत्र बटालियन आहे. लढाऊ विमानांच्या पायलट म्हणून काही स्त्रियांची नियुक्ती झाली आहे. भारतीय नौसेनेत काही स्त्रिया वरच्या जागेवर आहेत.

    याचा अर्थ स्त्री पुरुषाइतकीच निर्भय, कणखर, शूर, धैर्यवान आणि चिकाटीने कार्यशील राहू शकणारी आहे, याला पुरुषसत्ताकाने मान्यता दिलेली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, राज्य नागरी सेवा, पोलीस खात्यातील वरिष्ठ पदे, आदी महत्त्वाच्या जागेवर निकडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार करत, स्पर्धात्मक जगात निष्ठेने काम करणाऱ्या कितीतरी स्त्रिया अत्युच्च पदावर आहेत. त्यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असली तरी लिंगभावात्मक निष्पक्षता काटेकोरपणे पाळली गेली तर ही संख्या निश्चितपणे वाढू शकेल.


असे सकारात्मक चित्र समोर असतानाही अजून बराच बदल अपेक्षित आहे समाजात स्त्री ला पूर्णतः सक्षम बनवण्या साठी. तिला अप्रत्यक्ष अशा बऱ्याच पातळ्यांवर गुणवत्ता असतानाही अजूनही बऱ्याच ठिकाणी तिच्या फक्त स्त्री असण्याने मागे ठेवले जाते हे सर्व मान्य वास्तव दिसते.


      वरकरणी असे खुप सकारात्मक चित्र जरी असेल तरी अगदी घरा पासून ऑफि्सपर्यंत, मोठ्या हॉस्पिटल मध्ये किंवा सरकारी जागांवर ही स्त्री ला दुय्यम स्थान असू शकते हे नाकरता येणार नाही. घरादारा पासून ते सिनेसृष्टी पर्यंत आणि जागतिक राजकारणा पर्यंत सगळीकडे कुठे तरी स्त्री आहे म्हणून डावलले  गेल्याच्या घटना नेहमीच ऐकायला येतात.आणि सर्वांना माहित आहे कि,


दुय्यमत्व आणि शोषण हे नेहमी हातात हात घालून येतात. ज्यांना कमी लेखले जाते त्यांचे शोषण करणे सोपे व सहज असते. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांचे रूप बदलते, पण शेवटी 'बाई' म्हणून तिच्याकडे पाहण्याची वृत्ती जगात सर्वत्र सारखीच आहे.हे वास्तव स्थिती आहे.हे खरंच नाकरता येणारे नाही 


परंतु नेहमीप्रमाणे च  लेखात आपण नकारात्मक चर्चा न करता. समोर दिसणाऱ्या प्रॉब्लेम चे अतिशय logical शास्रशुद्ध आणि ताबडतोब action घेता येईल. पाऊले उचलता येतील असे solution based information बघुयात.

म्हणजेच आपण स्त्री वर कसा अन्याय होतोय, ती कशी आबला, दिन, दुर्दैवी आहे आणि आपला समाज कसा पुरुषप्रधान आहे यां निराशा दायक चर्चेला फाटे फोडणार नाही.

    आणि आपण उच्च स्तरावर स्त्री ला काय काय आव्हानांना सामोरे जावे लागते यावर फार न बोलता.


    आपल्या घरातील मुलीची लहानगी पाऊले कशी योग्य दिशेने पडतील, कसे तिला पुढील आयुष्यभराच्या आव्हानांसाठी सज्ज करायचे. जेणे करून तिचे भवितव्य सुखा समाधानात आणि जीवन संघर्ष वाट्याला येणार नाही असे बघुयात 😊


पुढील भावी जीवनातील तिच्या स्त्री असल्याने तिला जो संघर्ष सहन करायला लागू शकतो त्याला पुरून उरण्यासाठी आपण तिचे मानसिक भावनिक आणि शारीरिक ट्रेनिंग च तिला बाळकडू म्हणून देवू यात.

फार लहान मुलींना ही insecurity द्यायची नाही त्यांच्याशी यावर आत्ता बोलून पण पालकांनी लक्ष द्यायच. मोठ्या मुली तरुणी स्त्रीया  यांना हे खंबीर पने सांगायचे किंवा बाजवयाचे आहे.


    आपल्या घरातील -बालिका,

-लेकी,

-किशोरवयीन मुली

- लग्नेच्छुक मुली

- नुकतेच लग्न झालेल्या मुली

-आणि मग लग्नात होऊन दिवस झालेल्या मायमाऊली

सर्वांना च आज अतिशय मौल्यवान माहिती आपण देणार आहोत. सर्वांना लागू होणार आहे

स्त्री च्या सर्व वयात तिला ह्या उपाययोजना अमलात आणता येणार आहेत. पण निश्चितच जेवढे लवकर सुरु करू तेवढा फायदा जास्त होणार.

आपण स्त्री ला अगदी प्राथमिक पातळी वर म्हणजे घरा घरात होणाऱ्या समस्या पासून जगाच्या पाठीवर कुठेही विजयी, यशस्वी आणि प्रभावी ठरवेल अशी काही सूत्र आपण आज या लेखातून देणार आहोत.


      "मॅडम आई बाबांचे वाद भांडणे, आईची आयुष्यभर कुचंबना , ताई चे वरवर सगळे चांगले चाललेय पण तिच्या लग्नातील पोकळ पणा मला माहित आहे, तिला ऑफिस मध्ये ही खूप वेगळी च tensions आहेत मला प्रचंड tension आलेय नक्की काय करू. माझी नोकरी सांभाळून MBA च्या exam च्या तयारीकडे ही दुर्लक्ष होतेय. त्यांचे दोघींचे रीतसर arrangemarriage झाले होते तरी त्यांची ही अवस्था. मला खुप जास्त तणाव आलाय मॅडम. खुप anxious व्हायला होते. काय करावे. लग्नच करू नये कि काय? असं वाटू लागलेय, पुढे carrier मध्ये ही काय होईल याची भीती वाटते?"

    घरात लग्नाची घाई चालू असणाऱ्या तेजल ची घालमेल लक्षात येत होती. पण इतकी कि रडवेली होईल याची कल्पना नव्हती.तिला शांत करून तिचे ते session छान पार पडले. पुढे चार पाच session नंतर तेजल ने चांगले स्पीड पकडले आयुष्याच्या पटरीवर तिचा आता जोरदार प्रवास चालू आहे.

तेही नजरेतील आणि जीवनातील focus पुर्ण clear ठेऊन.

पुढे सहा महिन्यात पिंपल्स आणि असह्य ऍसिडिटी ची तक्रार होमिओपॅथीक औषधानी पुर्ण बरी झाली.

     

      तेजल ही प्रतिनिधित्व करते आशा असंख्य teenage किंवा विवाहिच्छुक तरुणीनंचे. ज्यांना खरं तर अवघे आकाश ठेंगणं आहे मुक्त वावरासाठी, जग जिंकण्याची कुवत क्षमता तिच्या नसानसात संचारत असतें. पण हिला स्वतः च्याच क्षमतांची जाणीव आणि कल्पना नाही आणि अगदी क्षुल्लक गोष्टी  जसे आपण सुंदर दिसणे याकमी महत्वाच्या गोष्टीमध्ये स्वतः ला व्यस्त करत असतें.

थोडक्यात तिच्या असन्यापेक्षा तिच्या दिसण्याकडे तिचा पुर्ण कल असतो.

   स्वतः च्या आणण्यसाधारण अस्तित्वा पेक्षा आपल्या रूप- सौंदर्याकडे तिचे लक्ष अधिक असतें. आणि ती निसर्गाचीच रचना असतें. Hormone ही तसेच शरीरात वाहत असतात.

   पण हाच काळ असतो स्वतः वर गांभीर्याने काम करण्यासाठी. आपले अस्तित्व उठावदार  आणि देखणे करण्यासाठी. कारण एकदा का लग्न झाले कि निसर्गदत्त जबाबदारी तिला स्वतः साठी काही करण्याची उसंतच देत नाही पुढे अक्ख्या जन्मभर.


    लग्ना पासूनच ती काही कळायच्या आत  एक - एका मोठमोठ्या जबाबदारीत अडकते. मग स्वतः साठी काहीतरी करायचेय स्वतः साठी काहीतरी करायचेय ही फक्त इच्छा च राहते. आणि नंतर नंतर स्वप्न.... जे कधीच पुर्ण होत नाही. असेच होते असंख्य अशा बावारलेल्या तेजल चे. ज्यांचा काहीही प्लॅन नसतो स्वतः साठी.


   परवा 8मार्च ला जागतिक महिला दिन साजरा केला आपण त्या निमित्त मी अशा बावरलेल्या असंख्य किशोरऊर्जे ला आज काहीतरी अत्यन्त मौल्यवान scientific आणि logical असा lifeplan देणार आहे.जो त्यांना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. अर्थात त्यांनी पाऊले तशी उचलली तर.


बाहेर स्त्री साठी अवघड परिस्थिती आहे कि नाही समाज पुरुषप्रधान आहे कि नाही यावर वृथा चर्चा वाद करत बसण्यापेक्षा प्रत्येक मुलीला तयार करूया सगळ्या परिस्थिती शी सामना करण्यासाठी 


खुप महत्वाचे म्हणजे ही पुढील धोके आणि उपाय योजना किंवा पाऊले सगळ्यां वयातील स्रियांना लागू होतात.


मी जरी किशोरवयीन मुलींना उद्देशून तयारी करायला सांगते परंतु जरी लग्न झाले असेल तरी हे सर्वांना लागू होते. 👍

   

      आपला समाज पुरुषप्रधान आहे dominating आहे. स्त्री इथे सुरक्षित नाही असे म्हणणे पूर्णतः खरे नाही. समाजातील खुप टक्के पुरुष हे स्त्री ला प्रेमाने आदराने ठेवतात.समाज तिला आदराने वागवतो पण

तरी 

↔️ *Her Preperation for the Future -


भावी आयुष्यात तिला कशाला सामोरे जायला लागू शकते तर


↔️1) Domestic DominanceExposure * -➡️


   🔅 परंतु काही टक्के (%मोजता नाही येऊ शकत कारण ते बाहेर दिसत नसते )

समाज हा अजूनही पुरुषप्रधान आहे त्यांच्याशी घरात सामना करताना तिची खुप ससेहोळपट आणि suppression नक्कीच होते.हे झाले घरात


↔️2) In Risky situations ➡️

      🔅बाहेर च्या जगात तिला स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी allert राहायला लागते याच समाजाचा एक छोटा हिस्सा अतिशय क्रूर पण आहे. जिथे अडचणीत आली तर बचाव करताना तिचे जीव ही जातात. आपण बातम्यात बघतो च रोज.


↔️3) At workplace and In Business -➡️

  🔅 नाकरता येणार नाही कि कामाच्या ठिकाणी पुरुषांचे प्रमाण जास्त असेल आणि कदाचित पिढ्यानंपिढ्या व्यवसायामध्ये आणि जॉब च्या ठिकाणी पुरुषांचे वर्चस्व असल्याने तिला तिथे अस्तित्व साठी चांगलाच संघर्ष करावा लागेल


↔️4) From same gender - Woman to woman struggle -➡️

🔅 - असे काही नाही कि तिला फक्त पुरुषांकडून च  struggle करावा लागेल. तर हीही तितकीच वस्तुस्थिती आहे कि वरील तिन्ही ठिकाणी 

1)Domestic 

2)Risky situations 

3)At work place

या ठिकाणी एकास्त्री कडून किंवा काही स्त्रीयां कडून तिला धोका संभावू शकतो.


↔️5) Struggle with self ➡️

       🔅सर्वात महत्वाचे *तुम्हाला सांगते हा 5th पॉईंट आहे कि struggle with self किंवा स्वतः च्या च complex आणि focus नीट माहित नसल्याने.... थोडक्यात स्वतः ची self image (pygmalion effect - आठवतेय ना? 😊) फारशी स्पष्ट आणि चांगली उंच नसल्याने ती स्वतः च्या शोधतच आयुष्य घालवते.

    स्त्री दुःखात असेल किंवा पच्छाडलेली असेल तर तिच्या ह्या self image self focus clear नसल्याने असल्याचे प्रमाण जवळजवळ 70% आहे.

   विचार करा किती possibilities आहेत self work साठी.


तर यां पाच ही कारणा वर समूळ प्रतिबंधक उपाय केल्यास. स्त्री नक्कीच तयार असेल सर्व शक्तिनींशी सामोरे जायला यां सर्व आव्हानांना.


मी sessions मधे तेजल ला सांगीतलेली psychology ची सहा सूत्र - सर्वांना इथे womans day निमित्त share करतेय


    आपल्या लहान कोवळ्या मुलींना, किशोरवयीन आणि तरुणीना आणि लग्नेच्छुक सर्व मुलींना.... तुम्ही पालकांनी ठणकावून सांगा, किंवा प्रेमाने समजावून सांगा किंवा पालकांनी च गुरवून घ्या लहान असल्यापासून... कि खाली दिलेल्या प्राथमिक गरजा पुर्ण झाल्याशिवाय बोहल्यावर उभे राहायचे नाही


नक्की काय करायचे***vimp⏭

(खाली दिलेले एक एक मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की seperate एक एक लेख होईल प्रत्येक मुद्ध्या वर..... लेखाची मर्यादा बघता आपण शॉर्ट मध्ये बघुयात.


↔️1)⏭️ Self Economical Independency* 


स्वतःच्या पायावर उभे राहायचे. जे काही शिक्षण घेतलेले असेल त्याच्या जोरावर कुठे तरी proper जॉब किंवा व्यवसायात उतरून किमान आपल्या उदरनिर्वाहा पुरता पैसा कामावणे,अर्थार्जन करणे.


आयुष्याच्या सगळ्या वळणावर कुठे ही मिंधेपणा येणार नाही असे जोरदार शस्र.🔅👍


↔️2) ⏭️ Self Proficiency -or self Efficacy 

  

  म्हणजेच जे काही शिक्षण घेताय तेच मुळात आवडीचे,आपला कल असलेले निवडावे आणि निवडून ही नुसते शिक्षण कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नाही घ्यायचे. तर त्या पुढे जाऊन,

    त्या त्या शिक्षणात प्रविण्य किंवा विद्वत्ता किंवा विशेष skills develope करण्या कडे  कल ठेवायचा.

सर्वात खणखणीत वाजणारे नाणे जाणूकाही.

कायमचे प्रभावी शस्र 🔅👍

     आपल्याकडे असे काहीतरी विशेष skills असावे ज्यामुळे आपल्याला विशेष संधी आणि ओळख मिळेल.

  शिक्षणात च हे ठरवावे अन्यथा जॉब करताना तर करावेच ठरवून असे काही skills भले वेगळा class लावा वेगळे गणितं जमवा पण हे मिळावा.

   हा हुकूमी एक्का असणार आहे आपल्या सगळ्या रणरागिनींचे भविष्यात.

  

↔️3) Self Respect ➡️ self value 


आपण च आपल्याला respect नाही दिला तर जग आपल्याला का देईल.

   म्हणून तिला शिकवा स्वतः चा respect किंवा आदर ठेवायचा कसा ते.

 हे एक खुप उपयुक्त शस्र असणार आहे आयुष्यभर.🔅👍

स्वतः चा आदर ठेवायचा म्हणजे दुसऱ्यावर ओरडून भांडून नाही. तर स्वतः च्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घेऊन उरलेल्या विनाकारण लादलेल्या, आरोप केलेल्या किंवा थोडक्यात आपला दोष नसेल त्या गोष्टींची owership घेऊ नका.

पटत नसलेल्या गोष्टीत मुद्दे स्पष्ट पण समोरच्याला न दुखावता मांडता आले पाहिजे. आणि मुद्दा मांडून झाल्यावर उरलेल्या चर्चा मध्ये स्वादर शांत राहणे शिकून घ्या.

    म्हणजेच जास्त बडबड, गोंधळ, रडारड तुम्हाला respect देणार नाहीत. ठामपणे मुद्दा मांडण्याने respect टिकणार.

ह्या जास्तीच्या गोंधळाने ती स्वतःची किंमत कमी करून घेतेय. आणि काहीशी बदनाम पण आहे.

जास्त भावनिक असण्याने होते असे. तर भावनिक व्यवस्थापन शिकून घ्या अवगत करा.

संयम शांतता आपल्या गुणवंत्तेबरोबरच आपली किंमत ही वाढवेल.


↔️4) Self Care ➡️

आपल्या व्यक्तिमत्वाचा चा सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच self care

Self care म्हणजेच स्वतःच्या शरीराची मनाची नीट इमाने इतबारे काळजी घ्यायला तिला आत्तापासून शिकवा.


Self care -

1)आपले lifestyle - नीट व्यवस्थित Deciplined ठेवायला शिकवा


2)आपला आहार ताजा fresh पौष्टिक घ्यायला शिकवा.


3)रोज regular शारीरिक व्यायाम करायला शिकवा


4) 7-8 तासाची झोपेचे महत्व समजावून सांगा 


5)आणि सर्वात महत्वाचे तिला मानसिक भावनिक व्यवस्थापन अवगत करायला शिकवा. नसेल जमत काही अडचण वाटली पुढे अडचण आली तर त्या विषयातील तज्ञ् व्यक्तीची मदत घेण्यात कुचारता कामा नये.

   ध्यानधारणा शिकवा शिकून घे म्हणावं


जमले तर स्वासूरक्षेसाठी कराटे, martial art शिकले तर फारच छान. जरी नाही शिकता आले तरी regular व्यायामाने शरीर सुदृढ आणि फिट ठेवायचेच आहे. काहीही risky वेळ आली तर दोन हात करता च आले पाहिजे. तेवढे शारीरिक बळ हवंच आपल्यामध्ये.


पुढे जाऊन हे self care तिला आयुष्यभरा चा अविरत ऊर्जा प्रदान करणार आहे.

हे शस्र अनमोल आहे👍.🔅


↔️5) Self Decision ➡️

-आपल्याला कशात गती आहे 

-आपल्याला नक्की काय करायला आवडते

- आपण कशात शिक्षण घ्यायचेय

-आपल्यात ह्या शिक्षणातील कुठले skill जास्त शिकून घ्यायचे

- आपण कुठल्या व्यक्तीशी लग्न करायचे

-कुठली नोकरी

-बाळ कधी घ्यायचे

- आणि जॉब कधी सोडायचा परत जोडायचा

- फॅमिली financial planning मधील सहभाग


यां सगळ्यां चा निर्णय भले सर्व आप्तेष्ठाशी चर्चा करून घेशील पण शेवटचा decision तुझा स्वतः चा असूदेत म्हणजे निर्णयांची ownership ही घेता येते मग.

हुकूमी शस्र 👍🔅


↔️6) Deep Loyal Self Involvement in Life accepted -


लास्ट पण खुप महत्वाचं.

आता एकदा वर दिलेल्या सगळ्यां पातळ्यांवर विचार करून decision घेतला.

आता मानलावून समरसून  जीवन जगा.

वरवर आळसा ने निवृत्साहाने नाही.

डोळ्यात तेज आणि अंगात स्फूर्ती आणून जगायचे.👍🔅शस्र आणि शास्र ही 

कधीपर्यंत????

मरेपर्यंत 🙂


आता बघा मी खुप महत्वाचे लॉजिक सांगते

आता यां आपल्या यां पिल्लांबरोबर पुढे

🔅दोन चित्र असू शकते

यांची लग्न झाले

Love marriage असो वा arranged marriage व्यक्ति नक्की कसा आहे हे कळायला बराच काळ लागतो. आणि खरं तर त्यानुसंघाने एक lottery च आहे अपल्याला नक्की कसा माणूस मिळेल हे कळणे म्हणजे.

अगोदर पासून जरी ओळखताय तरी लग्न नंतर चे चित्र काही वेगळे ही असू शकते.

तर 1) माणूस अतिशय चांगला, भला माणूस मिळेल, घरं नातेवाईक चांगले भेटले,


किंवा 2)माणूस काहीसा त्रासदायक मिळाला बाकी नातेवाईक वाईट मिळाले

तर 

बघा दोन्हीही ऑपशन्स मध्ये आपल्या रणरागिणी हतबल, दुर्दैवी आणि अबला नसतील.


वरील अगोदर सांगितलेल्या पाच ही पातळ्यांशी

1)domestic dominance,

 2)at workplace,

3)outside risky situations ,

4)woman to woman आणि

5)related to self

सामना करावाच लागला तर 

ह्या समर्थ असतील स्वतःचे रक्षण आणि उदरनिर्वाह करण्यासाठी. ☺️


म्हणजे अगदी नवरा पार्टनर चांगला नाही मिळाला, काही खुप त्रासदायक झाले पुढे जाऊन तर ही आपली रणरागिणी स्वतः च्या पायावर उभी असल्याने. तिचे फार काही अवघड होणार नाही. ती व्यवस्थित बाहेर पडेल त्या गुंत्यातून. आणि पुढे नंतर काय करायचे हे स्वतः शांतपणे ठरवेल.


आणि no.1 option कि चांगला पार्टनर लोक मिळाले जरी

आणखी महत्वा ची human psychology अशी असते की 

कितीही चांगला human being life पार्टनर म्हणून मिळाला सासू सासरे, boss किंवा व्यवसायात पार्टनर म्हणून मिळाला तरी

तुमचा self economical independency, self efficacy, self care, self respect, self decisions आणि आत्म मग्न पणे संसार करण्याने किंवा जगण्याने च  तुमची किंमत आयुष्यभर उंच राहणार आहे. अबाधित राहणार आहे.


कुठल्याही relation मध्ये आपण आपला respect ठेवणे, आपली स्वतः ची काळजी घेणे आणि स्वतः च्या पायावर उभे असणारी स्त्री नेहमीच कणखर, रुबाबदार आणि प्रभावी दिसते.... नात्या त प्रत्येकाला आशा अवस्थेतील स्त्री असेल तर नाते सरळ, सुव्यवस्थित आणि मानात, सहज सुंदर आदरात प्रवास होतो respectful असतें अशी नाती..... बऱ्याचदा.


कारण तुम्हीच जर वर ची सगळी शस्र  अवगत केली नसाल तर तुम्ही weak दुर्बल असणार. तुमच्यावर चे प्रेम आदर आणि सम्मान ही कमी होते नव्याचे नऊ दिवस संपल्यावर.

कायमस्वरूपी टिकते तेसौंदर्य देखणेपण असतें ते,वर सांगितलेले self work मुळे च असते. 


आता जर लग्न झालेल्या स्रिया आहेत तरी ह्या सगळ्यां शास्रशुद्ध ज्ञाना चा उपयोग नक्की च त्यांनाही तितकाच आहे.

    आशा आहे लेखातील माहिती सर्व वाचकांना उपयुक्त वाटली असेल. मला नक्की कळवा कसा वाटला लेख.

   जागतिक महिला दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देवून लेखा चा शेवट श्री अमिताभ बच्चन यांनी बोललेल्या त्यांच्या आवाजातील कविते च्या काही ओळींनी करूयात.😊


"तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है,

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है


जो तुझ से लिपटी बेड़ियाँ

समझ न इनको वस्त्र तू 

ये बेड़ियां पिघाल के

बना ले इनको शस्त्र तू

बना ले इनको शस्त्र तू

तू खुद की खोज में निकल।


जला के भस्म कर उसे

जो क्रूरता का जाल है

तू आरती की लौ नहीं

तू क्रोध की मशाल है

तू क्रोध की मशाल है

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है।"


धन्यवाद🙏😊

डॉ योजना चिराग,

PG Homoeopathy,

Sp REBT Psychology,

Certified Covid Educator,

Milestone Homoeopathy clinic,

Mukundnagar,Pune.

Contact- 9975753272

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा