हे पुरुषांनो,
तुमच्यापेक्षा किंचित वेगळ्या आहोत तन-मनाने ।
निसर्गाचेच हे देणे, स्वीकारू मोकळ्या मनाने ।।
स्पर्धक नव्हे आपण, दोन चाके होऊ रथाची ।
एकाला खीळ बसता, काय गती दुसर्याची? ।।
न उपभोग्य वस्तू न कुणाची खाजगी संपत्ती ।
प्रत्येक स्त्री आहे तुमच्याप्रमाणेच एक व्यक्ती ।।
हौस नाही आम्हाला देव्हार्यात बसण्याची ।
आम्ही आहोत, अर्धी लोकसंख्या जगाची ।।
फार नाही मागणे आमचे, एवढे मात्र करा ।
माणसांच्या शिरगणतीत आम्हालाही धरा ।।
--©आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा