#Thoughtful Write-ups ✍️
"आनंदाची शोधयात्रा"भाग -1
Quest for Happiness-part 1
🔹 डॉ योजना चिराग,
गुडीपाडवा ला माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी यांनी सुट्टी घेतली होती.दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विचारपूस केली कसा झाला पाडवा त्यावर अगदी प्रसन्न मुद्रेने मावशी बोलल्या "मस्त खूप छान झाला ताई, सकाळी नऊ दहा पासुन संध्याकाळ पर्यंत जवळजवळ 100-125 पुरणपोळ्या केल्या ताई 😇, 30-40 जण जेवून गेले,51 पुरणपोळी धाकट्या म्हणजे चौथ्या मुलीच्या पहिल्या पाडाव्या ला तिच्या सासरी पाठवल्या, चारही मुलींचे नवरे, त्यांच्या घरचे सगळे जेवू खाऊ घातले मान पान केला, दिवसभर पाहुण्यांचा रगाडा होता सांग्रसंगीत स्वयंपाक होता,
ताई माझ्या हाताचा स्वयंपाक सगळ्यांना आवडतो. पुरणपोळी जशी रेशमागत मऊ सूत ताई जिभेवर विरघळेल अशी, आजूबाजू च्यांना ही घरी ताट दिले.
आणि रात्री नऊ ला सगळं निवल्यावर मी जेवले ताई,"🙏🏻😊
मी तिच्याकडे प्रेमाने, आश्चर्याने, कुतूहलाने आणि अगदी मग्न होऊन तिचे ऐकत होते.
बघा मी विचारले नसते थांबून तर मावशीनीं मला काही सांगितले ही नसते आल्याबरोबर कामाला लागायची सवय आहे त्यांची. मी माझ्या कामात,patients च्या वाचनात किंवा लिखाणात किंवा मग फोन call किंवा ऑनलाईन सेशन मध्ये व्यस्त असते त्यामुळं त्या गप्पा मारत नाहीत मी free असेल तरच.
काल नऊ ला जेवली राहिलेली तिच्या घरची भांडी, स्वच्छता एवढे करून रात्री ही मायमाऊली कधी झोपली असेल आणि सकाळी घरी प्रसन्न मुद्रेने परत हजर 🙌😊
मला कमालीचे कौतुक वाटते ह्या उत्साहाचे आणि आशा लोकांच्या integrities चे.
मावशीला चार मुली, सगळ्यांची लग्न झालेली मोठ्या तिन्ही मुलींना दोन दोन मुले आहेत आणि धाकट्या मुलीचे नुकतेच लग्न झालेय, माझ्या मुलींएवढे नातवंडे आहेत तिला 😊😊आणि कामाचा उरक लक्षात आलाच असेल तुम्हाला.
तो भाग वेगळा कारण शारीरिक शक्ती आपण मागच्या काही महिन्या पूर्वी लेखात बघितली कि शरीर हे तर माध्यम असतें मनातील आतील समतोल समाधान याचे.
त्यामुळे अन्नाचे पचन त्याचे असिमिलशन्स, metabolism आणि प्रतिकारशक्ती ही फक्त आपण काय महागडे पदार्थ खातो यावर नसून आपले मनोराज्य कसे आहे त्यावर अवलंबून असतें.
म्हणूनच आर्थिक दुर्बल आणि कमी resources असणाऱ्या लोकांची immunity आणि शारीरिक शक्ती उच्च वर्गीयपेक्षा नेहमीच जास्त असतें तुम्ही सर्वांनी आजूबाजूला पहिलेच असेल.
पण त्या मावशीची आर्थिक परिस्थिती so so असताना त्या कायम आनंदी असतात त्याचे खरे कौतुक.
सारखं तक्रारी करत, विव्हळत जगण्यासाठी तिच्याकडे सगळ्यां गोष्टी असताना, जसे कि चारही मुली आहेत, आर्थिक परिस्थिती बेताची आहे, घरी काम बाहेर काम, कायम वैतागलेली राहू शकते तरी ती नेहमी प्रसन्न हसतमुख कशी राहू शकते?
"ठरवा कसं जगायचं कण्हत कण्हत कि गाणे म्हणत " त्या मायमाउलीला बरोबर उमगला अर्थ या कवितेतला.
असे आजूबाजूला असंख्य अनुभव तुम्हाला रोज जगण्याचे गणित उलगडून सांगत असतात, आजूबाजूची माणसे, घटना,आणि निसर्ग सुद्धा
learning lessons च जणू ते आपल्याला देत असतात. तुमचे डोळे, कान त्यासाठी उघडे पाहिजेत किंवा सतत काहीतरी नवं शिकण्याची इच्छा म्हणा किंवा ध्यास हवा.... खूप प्रगल्भ होता येते या खऱ्या निसर्ग दत्त शिक्षणसंस्थेतून.
तर हा सकाळचा मावशी चा अनुभव शिक्षण्याच्या शिदोरीत टाकला आणि माझ्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त झाले.
पुढच्या दिवशी क्लिनिकला पोहोचल्यावर पहिलेच REBT session होते.
राजश्री साधारण 47वर्षांच्या आहेत त्यांना गेले तीन महिने होमिओपॅथीक treatement सुरु केली होती आपल्या clinic मध्ये.
त्यांना Menorrhagia आणि Metrorrhagia म्हणजेच irregular periods आणि खूप जास्त bleeding चा त्रास होत होता शिवाय bloodpressure ही बराच वाढलेला ऍसिडिटी वाढलेली असे बरेच त्रास होते.
ब्लीडींग चा problem जरा settle झाल्यावर त्यांचे मानसिक व्यवस्थापन हा खूप महत्वाचा भाग असल्याने आज REBT session साठी अपॉइंटमेंट घेऊन राजश्री आल्या होत्या.
राजश्री 'Devine Digital and communication' नावाच्या शहरातील नामांकित digital मार्केटिंग क्षेत्रातील कंपनी च्या सर्वेसर्वा होत्या.
त्या सांगत होत्या
"मी बारा वर्षाची असताना माझी आई वारली,दोन भाऊ आणि दोन बहिणी या सर्वांचा सांभाळ करत Telco मध्ये बाबा जॉब करायचे त्यांनाही साथ देत शिक्षण घेतले.
सर्व भाऊ बहीण यांना चांगले शिक्षण दिले, खूप खस्ता खात स्वतः शिक्षण घेतले,
लगेच जॉब ही लागला अवघ्या 23 व्या वर्षी.
3 हजार महिना पगार पासुन आता कित्तेक लाखांची उलाढाल कंपनी करते. स्वतः चा SBroad पुण्यात मोठा बंगलो आहे.
सुरुवातीला सगळ्या कष्टाचे चीज झाले आशा आनंदात बरीच वर्षे गेली. रात्रीचा दिवस करून कष्ट केले. नवनवीन गोष्टी शिकून घेतल्या आणि भरपूर पैसा कामावला,लग्न झाले आवडीच्या व्यक्तीशी,मुले मोठी झाली, चांगल्या कोर्सेस ला गेली.
घरात सगळी सुखे पायाशी लोळण घेत असताना. सगळे successful चालले असताना,मागील 7-8 वर्षांपासून हळू हळू सगळ्यातला इंटरेस्ट गेलाय, कशातच आनंद वाटत नाही, अगोदर फक्त चिडचिड आणि वैताग आता कामातून किंवा कंपनीतून कितीही पैसा कमावत आहे तरी. काही फरक पडत नाही,
मला काही विशेष करावंसं वाटत नाही म्हणून Psychiatrist कडे मागील बरीच वर्षे जात होते पण त्यांनी सांगितले कि मला as such काहीही त्रास नाहीये, depression वैगरे तर नाहीच नाही.
असे निदान झाले. कारण मी दिवसभर सध्या घरी च असते पण रोजच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते पण आतून आता काही विशेष रस नाही ही भावना आहे फक्त.
काल गुडिपाडव्या च्या दिवशी आधी घरी करूया साजरा असे ठरवले आणि काय वाद झाला मुलाबरोबर तर एकही पदार्थ बनवला नाही घरी आणि बाहेरून आणून रात्री जेवले सगळे....असं चालले आहे सगळे.... रंगाचा बेरंग झालाय.... कळत नाही कुठे चुकतेय मॅडम " बोलल्या राजश्री.
मी त्यांचे session घेतले परत एक week ने next session साठी बोलावले.
पण मला तुम्हाला या दोन्ही उदाहरणा तुन काहीतरी सांगायचे आहे. खूप खूप जास्त महत्वाचे.आपल्या रोजच्या जीवनाशी अतिशय जवळचा विषय.... किंवा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कि आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा जगण्यातील प्राण, आणि सगळ्यां जीवनभर चालणाऱ्या धडपडी चे आद्य प्रयोजन म्हणजेच आनंद.... आनंदाचा शोध.... आपण हा आनंदा च्या शोधयात्रेला च निघुयात...
आनंदाची शोधयात्रा ची शृंखाला च करणार आहोत
त्यातील आज भाग 1 बघुयात
भाग 1 मध्ये आपण आपल्या सगळ्यांच्यामानातील एक अतिशय साधा समज बघुयात. कि हा आनंद आनंद नक्की मिळतो कशा तुन, त्याचा आपल्या income पैसा संपत्ती कामावन्याशी काही संबंध आहे का?
तर माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी सगळ्या बिकट परिस्थितीत ही हसत प्रसन्न आनंदी असतात कायम.... कायम च
तर राजश्री यांच्या आयुष्यात पैशाची कमी नाही धन दौलत अपरंपार,तीही स्वतः कमावूनही तरी त्या खुश नाहीत??? असे का
म्हणजे पैसा धनसंपत्ती, यश यांचा आपल्या आनंद या भावने शी काय संबंध च नाही का?
आपण कष्टाने कमावलेला पैसा, गाडी, बंगला या सुखसमृद्धीची साधने नक्की आपल्याला आनंद देतच नाहीत 😇🤔🤔?
तर मगआपण सगळे अख्खे आयुष्य या सगळ्या सुख समृद्धी च्या मागे का धावत असतो.... काय आहे नेमके शास्र ते बघुयात
↔️Money & Happiness Scientific Research ↔️
एक study केला गेला अशा लोकांवर ज्यांनी खूप कष्टाने मेहनतीने पैसे कमावले आणि आपली स्वप्न पुर्ण केली.
यामध्ये वेगवेगळ्या देशातील, मोठमोठ्या private कंपनी तील आणि गव्हर्नमेंट जॉब मधील मोठे ऑफिसर्स पण या study मध्ये participant होते.
Study किंवा research मध्ये दिसून आले कि ज्या देशांचा GDP जास्त होता ते दुसऱ्या लोकांपेक्षा जास्त खुश होते पण ख़ुशी चा संबंध मोठ्या सॅलरी शी नव्हता,भले तो गरीब देशात असू किंवा श्रीमंत देशातील असूदेत
या study मध्ये Ed Dinner म्हणतात कि Forbs चे सर्वोत्तम श्रीमंत लोक average अमेरिकन लोकांनवढेच खुश किंवा आनंदी आहेत.
म्हणजे च जर आपण जीवनाच्या basic गरजा पुर्ण करू शकता आहात, जर जीवन ठीकठाक चालू आहे. Insured आहे तर इनकम च्या पैशाच्या वाढण्याने आपल्या आनंदात जास्त काहीच फरक पडत नाही.
तुम्ही सगळे म्हणाल हे असे कसे 🤔🤔?
कशासाठी चालू आहे मग ही अहोरात्र पळापळ.... का सगळे संपत्ती कामावण्याच्या मागे धावत आहेत??
या प्रश्नाचे moral, किंवा तात्विक किंवा अध्यात्मिक उत्तर नाही बघायचे आपल्याला.
तर प्रत्येक लेखाप्रमाणे scientific शास्रशुद्ध माहितीच्या आधारेच आपण आपले concept clear करणार आहोत.
David Myer हे proffessor of Psychology United states मधील मोठे शास्रज्ञ् आहेत ज्यांची खूप सारी पुस्तके आहेत ह्या विषयी ते सांगतात
कि आपला brain किंवा मेंदू continuously सतत आपल्या आजूबाजूच्या environment मधून बघत बघत change करत शिकत राहतो आणि स्वतःला परिस्थिती नुसार adjust करत असतो.
म्हणजे ↔️एक सिग्नल त्याला मिळाला कि तो नवीन नवीन काही वेळा लक्ष देतो,पुढे तो सिग्नल जुना झाला कि दुर्लक्ष करतो आणि नवीन सिग्नल च्या शोधात अतिशय alert असतो तो सिग्नल catch करायला "↔️
आदिमानव अवस्था -जेव्हा हजारो कित्येक लाख वर्षे मानावाची उत्क्रांती होत होती तेव्हा तो पूर्वीची कित्येक हजारो लाखो वर्ष तर इतर प्राण्यांपासुन स्वतः ला वाचवून ठेवण्याच्या mechanism मध्ये पारंगत व्हायला त्याला लागली.
तेव्हा त्याला हजारो च्या हजारो वर्षे फक्त स्वतः चा आणि आपल्या कुटुंबाचा चा जीव वाचवणे हाच उद्योग होता.
त्यासाठीची मेंदूची यंत्रणा इतकी वर्षे सतत सतत वापरून जी बनली ती अजूनही आपली neuroscience किंवा मेंदूमध्ये वर्षा नु वर्षे same action -reaction,same action reaction ही process चालत आल्यामुळे आपण आजही त्याच यंत्रनेतून च स्वतः ला बऱ्याचदा बघत वाचवत Progress -Regress किंवा प्रगती -अधोगती जी काही करून घेतो ती ह्या मेंदूतल्या जुन्या processes मुळेच.
जेव्हा हजारो वर्षांपूर्वी आपण जंगलात राहत होतो तेव्हा आपले Trained survival mechanism आपल्याला प्राण्यांपासून वाचवत होते. जर आशा अवस्थेत आपण आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्याची जादू न्याहाळत बसलो, किंवा इतर त्याच त्याच गोष्टीत मग्न झालो तर आपले brain नवीन सिग्नल शोधणार नाही आणि alert दक्ष नाही राहणार आणि प्राणी खाऊन टाकणार आपल्याला.
म्हणून आपल्या मेंदूत अशी रचना बनली आहे कि जुने सगळे तेच ते सिग्नल विसरायचे आणि पूर्णतः नव्या सिग्नल साठी तत्पर राहायचे.
म्हणून जुन्या सिग्नल ला दुर्लक्ष करण्यासाठी आपल्या मेंदूला expert बनवलेले आहे देवाने म्हणा, Creator ने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा..... पण आहे ते वास्तव हे च आहे तेही laboratory त research केला गेलेल्या असंख्य हजारो लोकांवर वर उल्लेख केल्याप्रमाणे study केला गेला आहे.
प्रत्येक प्रयोगा नंतर Brain चे तपासन्या करून neurons आणि neurogenesis neurotransmitter यांचा व्यवस्थित अभ्यास करून ह्या मतांवर शास्रज्ञ् फर्म वास्तव statement देतात कि
आपल्या मेंदूत सतत नवनवीन सिग्नल साठी search साठी तत्पर असतो जुने मिळालेले सिग्नल तो पूर्णपणे विसरून जातो दुर्लक्ष करतो.
आता सापडले का आपल्या प्रश्नाचे उत्तर कि एवढ्या कष्टाने मिळवलेला पैसा संपत्ती आपल्याला अखेर कायमस्वरूपी आनंद का देत नाही.
लवकरच मेंदू ह्या सिग्नल कडे दुर्लक्ष करायला लागतो.
आनंद आणि आपल्या Achievements किंवा उपलब्धि यांचा संबंध बघुयात➡️
1)↔️ आपण अगदी लहान असताना आपले एक एक असे सगळे milestone achieve केले कि आई बाबा कौतुकाने टाळ्या वाजवायचे तो नवीन सिग्नल म्हणून मेंदू खूप मनापासून लक्ष द्यायचा आणि आपल्याला मनोमन आंनद व्ह्याचा,पुढे कविता गाणी भाषणे बोलले कि नातेवाईक आई बाबा कडून वाह वाह 👏👏टाळ्या मिळायच्या, पुढे वर्गात पहिला दुसरा आलो चांगले मार्क्स मिळाले कि नवीन सिग्नल आणि आनंद भावना मिळायच्या
2)↔️ आपण खूप struggle करून शिक्षण घेतले यश मिळवले डिग्री मिळाली कि आपल्याला खूप आनंद होतो तो एक नवीन सिग्नल असतो आपल्या मेंदूसाठी so त्याकडे खूप लक्ष देतो मेंदू आणि अर्थातच आंनद ही भावना निर्माण होते.
3)↔️पुढे पहिला पगार, खूप आनंद मग परत पगार वाढत वाढत जाणार तेव्हा तेव्हा आनंद....
पण आता काही milestone achieve केल्याचे वर्गात ल्या पहिल्या येण्याचे, पहिल्या पगाराचे काडीमात्र significance महत्व आणि आठवण मेंदूला राहत नाही... पुढच्या new सिग्नल च्या शोधात.
4) ↔️पुढे लाखभर income, पहिला फ्लॅट, पहिली गाडी, दुसरी गाडी, दुसरा मोठा फ्लॅट, मोठे office, पहिला विमानप्रवास, पहिली foreign trip, पहिल्यांदा परदेशात जॉब साठी जाणे, आपले पहिले मूल जन्माला येणं, त्याचे पहिले वाहिले सगळे संस्कार, त्याची शाळा त्याचे सगळे phases, त्यानंतर सेकंड home, फार्महाउस, शेती घेणे, किंवा मग मुलांची लग्न....... आणि नंतर वृद्धापकाळ....सगळं फक्त नवीन नवीन काही काळ आनंद देणार..... नवीन सिग्नल म्हणून..... जेव्हा जुने होईल तेव्हा.... त्याचे तिळमात्र कौतुक आपल्या brain ला राहत नाही....
Moral of the story ..... आपल्या ला कुठल्याही मागच्या यशाने, मागे कामावलेल्या किंवा आत्ता साधन संपत्तीने, पैशाने, गाडी, बंगला महागाड्या phones आणि foreign trips..... कशा कशानेच आनंद मिळतं नाही..... म्हणजेच पैशात आनंद नाही..... पैशात आनंद नाहीच मुळी😊✅️
आता कळले का कि राजश्री यांच्या कडे आपल्या सर्वांच्या सर्वसाधारण धारणे नुसार आनंदी राहण्याच्या सर्व पैसा, यश,घरं,गाडी phones सोयी पायाशी लोळण घेत असतानाही त्या खुश नाहीत अजिबात किंवा आनंद मिळत नाहीये त्यांना ह्या संपत्ती तुन आणि......
माझ्या कामवाली मावशी ला पैसा, संपत्ती आणि यश यातले काहीही नसताना ही रोज आनंदी राहायला, समाधानी राहायला जमत होते..... का???.... कसे????... 🤔
तर या प्रश्नाचे उत्तर आपण भाग 2 मध्ये बघुयात.
आशा आहे आजचा लेखही खूप मौल्यवान शास्त्रीय माहिती आपल्या रोजच्या जगण्यात add करेल आणि वाचकांचा आतला गुंता सोडवायला, concepts clear करायला मदत करेल आणि निश्चितच वाचकांचे जगणे कणभर समृद्ध करेल.लेख कसा वाटला त्याची आपली प्रतिक्रिया अभिप्राय नक्की नोंदवा 😊
धन्यवाद 🙏🏻😊
डॉ योजना चिराग
Dr Yojana Chirag,
PG classical Homoeopathy,
Sp REBT psychology,
Certified Covid Educator.
Milestone Homoeopathy Clinic Mukundnagar Pune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा