चांद्रमोहिनी येता मध्ये,
रविराजालाही ती खेळविते;
खग्रास कुठे वा खंडित कुठे,
तर कधी काकण लेऊन भुलविते;
मोहाचा तो खेळ पाहता धरा ही,
क्षणिक मनी मग गलबलते;
पण त्वरित......
मलभ मनीचे दूर सारित अवनी ही,
अलगद ग्रहण प्रितीचे ते सोडविते ....
- अर्चना खिस्ती-गोरकर....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा