या मर्त्य जगात काही चिरंतन असेल तर त्या गोष्टीच.. काय माहिती किती हजारो वर्षं आपण त्या ऐकत आलोय..
ही अशीच एक गोष्ट. जी ऐकताना, पाहताना तुम्ही आम्ही त्यात कुठेतरी आहोत असं तुम्हाला वाटत राहील..
'एकदा काय झालं' ही अशीच एक न विसरता येणारी गोष्ट आहे.
वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना.
स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला घेशील ना??
रे क्षणा थांब ना..
याचा हँगओव्हर कायम राहील. फार सुंदर झालं आहे हे गाणं..
नात्यांमधले अनेकविध पदर सलीलने किती तरलपणे टिपले आहेत.. पालक म्हणून, शिक्षक म्हणून, पत्नी म्हणून यातून जे गवसलं आहे ते शब्दात मांडता यायचं नाही... जे सलील कुलकर्णी यातून सांगू पाहतो आहेस त्याचं मोल आत्ताच्या काळात खूप आहे.
सलीलच्या गोष्टीचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कौतुक सगळ्या कलाकारांचं आहे. चिंतन, रघू, गुरू कसली भारी पोरं आहेत ही..त्यांची मूळ नावं लक्षात राहायचीच नाहीत आता..
😊😊
मित्रांनो 'एकदा काय झालं' हा सिनेमा थिएटरमधे जाऊन बघा ही आग्रहाची विनंती. कळत्या वयातल्या तुमच्या मुलांना नक्की दाखवा. त्यांना त्यातून खूप काही सापडणार आहे.
—अदिती जोगळेकर-हर्डीकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा