लेबल

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

फुलोत्सव

 फुलोत्सव


फुले काहि एकली उमलती

खोबणीत देठाच्या बसुनी

मुक्तपणे वाऱ्यावर डुलती


फुले काहि मैत्रीतच रमती

घोस तयाांचे भरुनि लटकती

अन गुच्छांचे मेळावे भरती


गुच्छांमध्ये दाटीवाटी

तरी मुळी ना ती भांडती

जागा अपुल्या ठरवून घेती


खालुन वर कधि वरून खालती

क्रमाक्रमाने उमलत जाती

कोमल किरण स्पर्शाने हरखती

पाखराांसवे गाणी गाती


चषक मधाचे त्याना देती

त्यांच्याकरवी इतर फुलांना

परागकणांची भेट धाडती


देवघेव अशी प्रेमाची

चालूच असते यांची साची

लगबग चाले नित्य निरंतर 

मधुरमनोहर संमेलनांची 


मनसोक्तपणे जगून घ्यावा

एकदिसाचा जन्म आपुला

वाटत असेल का फुलाला?

छान फुलावे गाणे गावे

पराग अन द्यावा मधुप्याला

-ऋचा देव–

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा