लेबल

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

कविता

 सागराची गाज जणू साद निसर्गाची

आसावलं मनं घेई धाव किनाऱ्याशी


फेसाळल्या लाटांची शोभाच आगळी

थंडगार वार्याची धुंदीच वेगळी

मुलायम स्पर्श करी रेती पावलाशी

आसावलं मनं घेई धाव किनाऱ्याशी


निळ्यानभी रवीची लालिमा निराळी

शुभ्रकांती पक्ष्यांची खुलते रांगोळी

केतकीचा गंध नेई वारा दूरदेशी

आसावलं मनं घेई धाव किनाऱ्याशी


नित्यनवी रुपेही सृष्टीची निराळी

कोमेजल्या कळीची उमले पाकळी

सुखावती नेत्र होई तनू मोरपिशी

आसावलं मनं घेई धाव किनाऱ्याशी


--सारिका बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा