********
*मला कळलेली आई*
********
प्रिय आई,
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या विषयी व्यक्त व्हावं असं वाटतंय..
मनातली खळबळ सुरू आहे खूप दिवस..
आम्हा तिघींची आई म्हणून जे काही तू भरभरून दिलं आहेस ते अमूल्य आहे..
पालक म्हणून तुम्ही दोघांनी तुमचं आयुष्य दिलं..ना कधी कुठली हौस, ना कुठले छंद..केवळ आमचे आई बाबा ची भूमिका करत राहिलात..
मी जेव्हा स्वतः ला या भूमिकेत बघते, तेव्हा जाणवत की , स्वतः चे आनंद बाजूला सारून केवळ मुलांसाठी जगणं किती अवघड आहे..
आई, बायको, बहीण, आत्या, मामी, मावशी, भावजय, सासू, आजी ह्या सगळ्या नात्यांपलीकडे जाऊन एक स्त्री म्हणून, व्यक्ती म्हणून तुला वेगळं करणं खूप अवघड आहे..
तुझ्या हातची चव..तू शिवलेले ड्रेस, तू शिवलेल्या बॅग्स, तुझ्या रांगोळ्या..एक ना अनेक..कितीतरी कला तुला अवगत..शिलाई मशीन शिकणं मला आज पर्यंत कधी जमलं नाही..पण तू मात्र निष्णात..
मला ड्रेस मध्ये सतत काही तरी वेगळं हवं असायचं..ह्या मैत्रिणी cha, tya मैत्रिणीचा असं मी तुला काही ना काही दाखवायचे आणि तू स्वीकारायची स ते आव्हान.. तू ठरवलं आणि काही करू शकली नाहीस अस होत नाही..
आणि जे करायचं ते मंनाजोगत होत नाही तोवर प्रयत्नांची पराकाष्ठा करायची..कित्येक दा रात्री बसून शिवण उसवताना तुला मी पाहिलं आहे ...
तुझी मनशक्ती दांडगी..साखरेवर नियत्रंण तू ज्या प्रकारे राखले ते कौतुकास्पद.. एकदा ठरवलं , की गोळी खायची नाही..मग त्यासाठी जे लागलं ते सगळं तू करतेस..
Tecnology la आपलंसं करत आलीस कायम..शिकण्याची इच्छा आणि वापरण्याचं कसब..दोन्ही आहे तुझ्याकडे..मला आठवत..2001 मध्ये जेव्हा कॉम्प्युटर घरी आला तेव्हा तो शिकून घेतलास आणि मग त्यावर पत्ते खेळणं हा तुझा विरंगुळा झाला होता..
तू जितकी हळवी, तितकीच प्रसंगी कणखर होताना ही मी पाहिलं आहे..बाबा परगावी ऑडिट साठी गेल्यावर एकटीने घर सांभाळणं..आम्हा तिघींना घेऊन मुंबई, पुण्याचे प्रवास करणं..एकदम dashing होतीस तू..गर्दीच्या बस मध्ये चढण तुला पाहून शिकले मी..
घरातल्याबरोबर शेजायांना जपणं..त्यांना जीव लावणं हे मी खूप लहान पणी पासून पहात आली आहे..आज जेव्हा कुहू तुझ्या कडे येते तेव्हा तिलाही तू नाती इतकंच प्रेम देतेस..
खूप स्वाभिमानी आहेस तू..मी स्त्रीवादी असण्याचे मूळ मला तुझ्यात सापडते..अन्याय सहन न होणारी..प्रसंगी वाद घालणारी..तुला जे योग्य, खर वाटतंय त्यासाठी आग्रही असणारी..
कधी खोडकर तर कधी गंभीर आहेस..
तुझी कितीतरी रूप पहिली आहेत, अनुभवली आहेत..
कितीतरी मनात रुजली, झिरपली..
काही न पटलेली..त्यासाठी तुझ्याशी घातलेले वाद ही तू मोकळे पणाने घेतलेस..
कित्येक वेळेस आमची मैत्रीण झालीस..अवघड क्षणी मन मोकळं करता येणारी हक्काची व्यक्ती झालीस..
आई म्हणून तू जितकी भारी आहेस,
जेल क्वार्टर मधली एकदम सडेतोड, सरळ मार्गी, सागडे बाई आहेस..
भाच्याची लाडकी लता मावशी, लता आत्या, लता मामी, काकू आहेस..
नातवडांची लाडकी आजी आहेस..
..तशीच एक व्यक्ती म्हणून ही तू खूप सुंदर आहेस..
अशीच मस्त रहा..
तुला आनंदी, मनसोक्त, निरोगी आयुष्य लाभो हयाच तुला आजच्या प्रसंगी शुभेच्छा
-रुपाली.
-----------
रुपाली सागडे - कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा