सूर्यास्त
पृथ्वीच्या दुसर्या गोलार्धा
उजळविण्या मित्र निघाला
अंधार ठेवूनी सोबतीला
अवसर देतसे विश्रांतीला
रमलेल्या किरणांना सगळ्या
चुचकारित चालवू लागला
गोरज भिडता आभाळा
गगनी लालिमा पसरला
वृक्ष पाखरांनी गजबजला
गहिर्या हिरवाईत बुडाला
जोर चढता रातकिड्याला
निशाचरांस रिझवू लागला
जो ढकलत जगतो दिवसा
सुस्कारा तयाने सोडला
कामाला दिवस पुरेना
क्षणभर तो हळहळला
उदय अस्त अन् उदय पुन्हा
चक्र फिरतसे रात्रंदिना
हो फिरुनी ताजातवाना
शोध उषेच्या पाऊलखुणा
-- आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा