सुट्टी
ग्रहगोल सारे चालताती अखंड
बांधिले जे ऋताने स्पंदते ब्रह्मांड
धावतसे काळरूप वारु निरंतर
होऊ शके स्वार कोण तयावर?
सूर्य चंद्र तारे सदा तेवतात
जग उजळाया ताप सोसतात
पंचमहाभूते नित्य राबतात
जन्ममरणाचा खेळ मांडतात
स्वधर्ममार्गी न घेती विश्राम
नेमे आचरती स्वकर्म निष्काम
देहांतीच देती कर्मासी विराम
अनुसरावे तयां करोनी प्रणाम
--आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा