लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

अनुभूती

 "अनुभूती"


शोधत असते तुला

आजू बाजूला

रंगभूमीवरच्या आणि पडद्या वर च्या 

प्रत्येक "सुंदर" पात्रांत !

असतोस नेहमीच 

माझ्या आजूबाजूने

समोरुन मागे

आंतुन बाहेर

जगत असते दुहेरी

अंतरी काहूर

अन ओठांवर मौन

अनपेक्षित येणारी सापेक्ष 

काहूरलेली वेळ

तू मात्र

क्षितिजावर अढळ

जो नुसता दिसतो 

न गवसणारा

तुझ्या असण्याचे अन

नसण्याचे ही सत्य

उरी बाळगून आहे

जपलंय आजवर

शोधलंय आजूबाजूने

बाहेरून आंत

जणू गिळून टाकलंय मी

ते क्षितिज ! लालसेपोटी

जेे नक्कीच आहे

तरीही हाती न लागणारे!

शोधत आहे माझ्यात

आजूबाजूच्या प्रत्येक 

"सुंदर" पात्रांत

मग ध्यानांत आलं

का आहे हा शोध !

जेव्हा की अंतरच 

संपुष्टलय.... विरलोय 

तू माझ्यात नी मी तुझ्यात

एकच तर आहोत !

भले .... 

स्थल काल दिशा निष्प्रभ ठरल्या

शोध संपला

नुसती अनुुभूति "सुखाची"

एकमेकांसाठी असण्याची !

एकच आहोत याची !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा