लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

अनुभूती

 अनुभूती


सूर अंतरी अवचित घुमले

मनवीणेवर तरंग उठले

गाभार्‍यातून शब्द उमटले

अंतरंग गंधाने न्हाले


मानस अवघे डोलू लागले

लय-तालाशी समरस झाले

गगन-धरेचे अंतर सरले

मधुर सावळे धुके दाटले


भवतालाचे भान उसवले

जीवा-शिवाचे मैत्र बहरले

मिटले डोळे अस्फुट हसले

नाद अनाहत आर्त शमविले


--आसावरी गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा