पुस्तक परिचय :
प्रवाहाच्या दिशेनं पोहणाऱे अनेक असतात. एखादाच प्रवाहाच्या उलट दिशेने पोहतो. लोक त्याला वेडा म्हणतात... समाजाने घालून दिलेल्या वाटांवरून चालणारे अनेक असतात. पण एखादाच 'आपली' अशी वेगळी वाट शोधून काढतो. लोक त्यालाही वेड्यातच काढतात... पण स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून... लौकिकाची पर्वा न करता 'जो' आपलं ध्येय गाठतोच 'तो' त्याच्या क्षेत्रातला 'ध्रुवतारा' बनतो. ही गोष्ट आहे अशाच एका विचारवंताची, तत्त्वज्ञान्याची, एका मानसोपचार तज्ञाची! त्याचं नाव आहे 'अल्बर्ट एलिस'!
'मी अल्बर्ट एलिस' ही डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेली आत्मचरित्रपर कादंबरी!
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा 'दृष्टिकोन' त्या गोष्टीबाबतच्या 'प्रतिक्रिया' ठरवतो... प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती बिनचूक करू शकत नाही... कोणीच परिपूर्ण असत नाही... या आणि अशा अनेक जीवन तत्वांचा विचार मांडत लोकांनी निरोगी आनंदी आयुष्य जगावं म्हणून ज्यांनी 'विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचं तंत्र' जगाला दिलं... त्या मानसोपचार तज्ञाची... म्हणजेच अल्बर्ट एलिस यांचीही जीवनी...
अल्बर्ट एलिस यांच्या वयाचा 9 ते 94 एवढा मोठा कालखंड डॉक्टर अंजली जोशी यांनी आपल्यापुढे उभा केला आहे! कथेच्या अनुषंगाने येणारी पॉल, जेनेट, कँरल, जेन ही सगळी पात्रं आणि त्यांच्याबरोबरचे प्रसंग अगदी सहज नजरेसमोर उभे राहतात. लेखिका आपल्याला कधी बोटॅनिकल गार्डनला फिरवून आणतात तर कधी आलिशान हॉटेलमध्ये घेऊन जातात.
एलिस यांनी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मांडलेले विचार, तत्वं ही त्या त्या वयासाठी उपयोगी ठरतील अशीच आहेत.. त्यामुळे कुठल्याही वयाच्या माणसाने पुस्तक वाचल्यास आयुष्याकडे बघण्याची, जगण्याची नवी दृष्टी मिळू शकते...
एकूणच सांगायचं तर पुस्तक एकदा वाचायला घेतलं की ठेवूच नये असं वाटतं...आपल्या विचारांना आव्हान देणारं, प्रकरणागणिक उत्कंठा वाढवणारं आणि शेवटी एलिसांच्या कर्तुत्वाला, एकूण जीवन जगण्याच्या त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीला, झुंजार लढ्याला, अफाट अचाट बुद्धिमत्तेला, साहसाला... नमन केल्या वाचून राहवत नाही.
पुस्तक संपल्यानंतर आपण आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहायला लागतो हे नक्की!
एलिस यांनी मांडलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या कल्पना काही अंशी पटतात पण काही वेळा त्या स्वैराचारास आमंत्रण तर नाही ना... असेही वाटते.
'देव' या संकल्पनेवरचे त्यांचे विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सश्रद्ध माणसाला सुद्धा पुन्हा एकदा या संकल्पनेचा विचार करायला प्रवृत्त करतात.
पुस्तक वाचल्यानंतर एक विचार मनात राहून राहून येतो की शालेय जीवनात मानसशास्त्र या विषयास धरून एखादा विषय का शिकवला जात नाही... तत्त्वज्ञान असं नव्हे पण त्याच्या जवळपासचा मनाला 'विवेक' शिकवणारा एखादा विषय शालेय जीवनात शिकवावा. असं वाटतं....
बाकी ज्यांना काही टिप्स काढायची सवय असेल त्यांनी पुस्तक वाचताना अवश्य पेन आणि वही सोबत ठेवावी.
पुस्तक : मी अल्बर्ट एलिस
लेखिका : डॉ. अंजली जोशी
प्रकाशक : यशोधन (येशू) पाटील
शब्द पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : 340
मूल्य : चारशे पंचवीस रुपये.
✒️ सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर
लेबल
- 01.कथा (5)
- 02.नाट्य छटा (1)
- 03.कविता रसग्रहण (5)
- 04.ट्रेक (8)
- 05.प्रवासवर्णन (21)
- 06.भजन (1)
- 07.भक्ती गीत (1)
- 08.कविता (52)
- 09.लेख (60)
- 10.खाद्य भ्रमंती (8)
- 11.पुस्तकपरिचय (4)
- 12.चित्रपट परीक्षण (1)
- 13.व्यक्तिचित्र (2)
- 14.अनुभूती (1)
- 15.चारोळ्या (2)
- 16.नाटिका (3)
- अजय घाणेकर (2)
- अथर्व बिवलकर (1)
- अदिती जोगळेकर-हर्डीकर (2)
- अभिजीत कारेकर (1)
- अर्चना खिस्ती-गोरकर (11)
- आसावरी गोखले (12)
- ऋचा देव (6)
- कल्याणी बोरकर (4)
- किर्ती पांडव (2)
- केयूर कानडे (1)
- कौस्तुभ सांभारे (2)
- गिरीश खोडके (1)
- ज्योती नेरकर (1)
- डॉ योजना चिराग (3)
- धनश्री केयूर कानडे (5)
- पालक अभिव्यक्ती नियोजन गट (1)
- मिलिंद फडके (9)
- रुपाली सागडे कुलकर्णी (7)
- रेवती गोखले (4)
- वंदना बोकील-कुलकर्णी (1)
- शलाका मेहता (1)
- सचिन चव्हाण (1)
- सुखदा आठल्ये (1)
- सौ . शिल्पा जरे (1)
- सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर (6)
- सौ. सारिका नितिन कुडले (1)
- सौ.चन्नम्मा सगणे (2)
- स्मिता श्रीपाद (28)
- स्वरूपा कुलकर्णी शहापुरकर (9)
- हर्षाली वाघोले (5)
- हेमा हर्षाली (1)
- हेमांगिनी जावडेकर-पुराणिक (3)
- ज्ञानेश्वर नेरकर (1)
रविवार, ११ डिसेंबर, २०२२
पुस्तक परिचय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा