लेबल

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

 "खाण्यासाठी जन्म आपुला "

 "खाण्यासाठी जन्म आपुला "
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत हे सर्वांना माहीत आहेच. पण जसा काळ बदलत गेला तशा ह्या सर्व गरजा अगदी advanced झाल्या बरं का! सगळ्या गरजांमध्ये इतकी variety आली की विचारता सोय नाही. आणि त्या पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी मानवाने अगदी अलगद पेलली.
अन्नाशिवाय जगणे म्हणजे ...just impossible. अहो, भूक लागली की लहान मुलांची चिडचिड होते, मुलांचीच काय आपली मोठ्यांची पण होतेच की . आठवून पाहा बरं एखादा प्रसंग😆 हसायला आले ना.... माझा लहान मुलगा विनाकारण रडायला लागला की मी हातातली कामे बाजूला ठेवून पहिलं त्याला खाऊ घालते तेव्हा स्वारी एकदम खुश होते. यावरूनच पाहा की जेवणाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे.
Weekends ला बाहेर खरेदीसाठी जाणे होतेच आपले, खरेदी मनासारखी होवो अगर न होवो खाणे मात्र होत असते. म्हणजे कारण काहीही असो बाहेर खाण्यासाठी काही कारण लागत नाही. बऱ्याचदा घरातून खाऊन बाहेर पडलो तरी मुलं म्हणणार ,अगं आई किती भूक लागली आहे काही तरी खाऊ ना. मुलांना तर तसंही बाहेर खायला आवडतेच. मोठ्यांना आवडत नाही असे नाही बरं का🙂
पुण्यात शॉपिंग ला गेलोय आणि काही खाल्ले नाही असे होतच नाही. मुगभजी, कांदाभजी,वडापाव, समोसा,SPDP, पाणीपुरी, रगडापुरी...अगं आई गं! माझ्या तर तोंडाला पाणी सुटले...तुमच्याही सुटलं असेलच...🤤
भुक असली नसली तरीही आपण एखादा वडापाव अन् cold coffee अश्शी जिरवू शकतो नाही का? माझे यजमान पुण्यातच लहानाचे मोठे झालेत, त्यामुळे त्यांना पुण्यात अगदी कोणाकडे काय special मिळते ह्याची अगदी इथंभूत माहिती आहे, त्यामुळे बरेच स्पेशल पदार्थ चाखायला मिळालेत 😋
अलिकडच्या काळात पिझ्झा बर्गर चे फॅड आले पण आपल्या लहानपणी दडपे पोहे, सांजा, पोळीचा लाडू, थालिपीठ,पाटवडी, आंबोळी, फणस पोळी असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ होते. हे सगळे पदार्थ आजी अन् आई अगदी प्रेमाने बनवायच्या की बस् पुछो मत! ☺️🥰
बऱ्याचदा जेव्हा आपल्याला  उपवास असतो नेमका त्याचवेळी कुठून तरी असा छान सुगंध येतो की बास्...आपल्याला आपण आजच का मी उपवास केला ह्याचा राग यायला लागतो😏 घरात पण उपवासाच्या दिवशी च आपल्या माघारी काहीतरी जोरात planning सुरू असते आज की नाही आपण मस्त हक्का नूडल्स, फ्रॉईड राइस वगैरे वगैरे खावूया. जाणार कोणीच नसते पण उगाच आपली मज्जा करायची म्हणून 😇
सध्या youtube वर जगभरातल्या recipes खचाखच पडलेल्या असतात. आपणही टाईमपास म्हणून त्या पाहतो पण करतो आपल्याला जे आवडतं तेच(हे महत्त्वाचे) जर घरीच हॉटेल सारखे पदार्थ करायला लागलो तर हॉटेल ओस पडतील🤣
पुण्यामध्ये मागील काही वर्षी भीमथडी जत्रेचे आयोजन केले जायचे,तिथे संपूर्ण महाराष्ट्रातील पदार्थांची रेलचेल असायची.प्रत्येक जिल्ह्याच्या प्रसिद्ध पदार्थांची विक्री तिथे होत असत. आपल्यापैकी बरेच जणांनी त्या पदार्थांचा आस्वाद घेतला असेलच.
मला आठवतंय, lockdown लागण्यापूर्वी माझ्या वाचण्यात आले होते की सिंहगड रोडला 'मिसळ महोत्सव ' आहे. जरा व्यवस्थित माहिती काढली तर नेमका शेवटचाच दिवस होता. मग काय झालो तयार लगेच,माझी फॅमिली अन् दिर-जाऊ . आता मिसळ खायची म्हटल्यावर पोट जरा रिकामेच हवे नाही का, नाही तर मिसळपावचा अपमान होईल (शास्त्र असतं ते😆)
सगळ्यांनी वेगवेगळ्या चवीच्या खानदेशी, सावजी, कोल्हापूरी अशा नाना प्रकारच्या मिसळींवर यथेच्छ ताव मारला. आहाहा. ...! पदार्थ एकच पण काय विभीन्न चवी होत्या त्या, आठवून सुध्दा तोंडाला परत पाणी आले.
प्रत्येकामध्ये एक खवैय्या लपलेला असतो. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी देखील वेगवेगळ्या असतात. खाण्याचा विषय निघाल्यावर  अगदी अबोल माणूस सुद्धा तुफान बोलू शकतो.
बास्स.... आता अजून लिहीत बसले तर मस्त चटपटीत खायची इच्छा होईल पण खाता काही येणार नाही , उपवास आहे ना आज माझा😉


सौ. सारिका नितिन कुडले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा