आमचं आपलं वारातीमागूनच घोडं..
अति लघु कथा (अलक) लिहिण्याचा पहिला वहिला प्रयत्न केलाय ..
पहिलाच प्रयत्न असल्याने चूक भूल माफी. कसं वाटतंय सांगा 🙏
१) मनाची दोलायमान स्तिथीला कंटाळून मी झोक्याला विचारलं .. तू कसा स्थिर होतोस रे?
शांतपणे झोका म्हणाला, "तू पण तुझ्या मनाला नामस्मरणाच्या, ध्यान धारणेच्या मोठ्या फांदीला बांधून बघ बरं."
२) "तुझ्या एकसुरी, कंटाळवाण्या आयुष्याचा तुला कंटाळा येत नाही का रे?" मी झोक्याला खिजवत विचारलं.
"अरे झोका घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर जसं हसू पसरतं तसं हसू एकाच्या चेहऱ्यावर आणून बघ ..अशी दहा आयुष्यं हवी म्हणशील. " माझ्यातलं खुजेपण दाखवतं शांतपणे झोका उत्तरला.
३) पोरं झोक्यावर खूप कलकलाट करतात म्हणून पार्वतीने आंब्याच्या झाडाला बांधलेला झोका रागारागाने काढून टाकला. का कोण जाणे पण त्या वर्षांपासून आंबा कधी बहरलाच नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा