लेबल

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

चंद्रयान ३

 # चंद्रयान ३

#Proud Indian


चंदा मामा खट्याळ भारी,

आकाशात घालून धिंगाणा,

छळायचा सगळ्या ताऱ्यांना....


एकदा आई त्याला रागवली,

म्हणाली, थांब सांगते ISRO ला....


ISRO ने धाडलं यानाला,

चंदा कुठला घाबरायला,

लागला धुराळा उडवायला,

अन् मोडून काढले यानाला....


ISRO झाला रडवेला,

मोदींसह देशची गेला समजवायला.....


उभारी आली ISRO ला,

देहभान हरपून लागले सारे कामाला,

निज श्रावण मासची त्यांनी निवडला,

खात्रीच मनी की, भाऊ रक्षितो बहिणीला.... 


गृहपाठ यावेळी पूर्ण केला,

स्थळही नेमीले भेटायला, 

अन् पून्हा धाडिले यानाला....


आता चंद्रही गहिवरला,

पसरले बाहू दोन्ही स्वागताला,

मजल दरमजल याने करता,

फडकविला अखेर "तिरंगा" आजोळाला....


@अर्चना खिस्ती-गोरकर, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा