!!एक नवा प्रयोग!!
प्रबोधिनी म्हणजे नवीन काहीतरी वेगळी सुरुवात करायची आणि ते प्रत्यक्षात उतरवायचं पण !
यावर्षी युवती विभागाने एक नवीन विडा उचलला आणि तो म्हणजे जगातला सर्वात जुनं असं मार्शल आर्ट पथक गणपती उत्सवात सादर करायचा.
ज्ञान प्रबोधिनी नेहमीच काहीतरी चांगले समाज प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करते. साधारण ४० वर्षांपूर्वी गणेश उत्सवाला जो वेडवाकडे संगीत, नाच आणि धिंगाणा चालला होता, ते थांबवण्याची बऱ्याच लोकांची खूप मनापासून इच्छा होती आणि याच बरोबर तरुण रक्ताला गणपती उत्सवात एक चांगली दिशा देण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरु केले. ते प्रयोग समाजाला आणि संस्कृतीला धरूनच होते यात काही शंका नाही. प्रबोधिनीने ढोल, ध्वज, बर्ची आणि लेझीम पथके सुरू केलेत आणि ते आज महाराष्ट्रात उत्साहाने सगळीकडे राबविली जातात. आपल्याला यातले ध्वज आणि ढोल पथक हे बऱ्याच ठिकाणी दिसतात.
एक नवीन प्रकार कलरीपयट्टू, हा एक पारंपारिक मार्शल आर्ट प्रकार आहे. अशी आख्यायिका आहे की महर्षी परशुराम यांनी केरळामध्ये याची स्थापना केली. आजही ती केरळच्या भागात शिकवली जाते आणि त्याचे थोड्याफार प्रमाणात त्याची गुरुकुल पण आहेत. असेही म्हटले जाते की केरळाच्या एका राजकुमाराने चीनमध्ये गेल्यावर तिथे तो प्रकार शिकवला आणि त्यातूनच पुढे कुंफू आणि तायक्वांदो सारखी मार्शल आर्ट विकसित झालेत.
या नव्या उपक्रमामध्ये साहजिकच प्रबोधिनीच्या युवतीविभागाने भरपूर मेहनत घेतली. स्वतः ताया कलरी शिकल्यात. एका गटाचा त्याचा व्यवस्थित दोन महिने सराव करून घेतला.
या पथकाचे चार वेगवेगळ्या गणपती मंडळासमोर धडक प्रात्यक्षिके झालीत आणि अनंत चतुर्दशीच्या गणपती मिरवणुकीत पण त्यांचा सहभाग उठून दिसत होता.
हा प्रयोग प्रबोधिनीच्या विचारसरणीत पुढे ठेवायचा की नाही हे शोधबोध बैठकीत ठरेलच पण नवीन काहीतरी करण्याची जिद्द आणि ते यशस्वीपणे करून दाखवण्यासाठी अथक परिश्रम हे सारे कौतुकास्पद!
असेच नवनवीन प्रयोग भविष्यात सदैव होत राहोत ही ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना!
गिरीश खोडके, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा