तर अर्ज किया है --
खोडित काटे वाटेतले,
गुज सांगी ती मनातले;
सगळेच येथे थोटके,
परीपूर्ण ऐसा कोण गे ?
कंटके श्राप तयाला,
नसे त्याचा दोष गं;
तरीही देऊन मज आधार,
तो वाही माझा भार गं.....
सोडूनी जे बोचते,
सुखच फक्त मी वेचते;
अर्पूनी सर्वस्व आम्ही,
खुलवितो ही प्रित-वेल....
कंटके लेऊनी ऊरी,
आधार मज हा मारवा;
लोपितो देईन त्यासी,
मम उरीचा गारवा.....
@अर्चना खिस्ती-गोरकर ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा