" बंद कवाडे "
आज पहाटे कविता झाली
प्रसव वेदना करपलेल्या
झोप उडाली, चार आसवं गळाली
इवल्याशा मनाला मणा मणांचे ओझे बांधलेले
त्यास गूढ गर्तेत भिरकावले गेले
कटाक्षाने निक्षावलेले
उफाळून येणे आता तुझे हे
मज नाही झेपायाचे
हिरमुसले कोमेजले निश्चलले गेले
त्याची हजार प्रश्ने
मी अनुत्तरित आहे
पाठ फिरोनी निघून आले
हल्लक जीव घेऊन आले
ही बंद कवाडे अबोल झाली
गवाक्षातुनही दिसणार नाहीत
आणि खोल खोल झुरली तरी
कागदावर उतरणार नाहीत
या बंद कवाडांचा
न्यायनिवाडा करशील का ?
हवे तसे स्वच्छंदी जगणे मिळेल का?
ओटीत सुखाचे माप घालशील का ?
©️ स्वरूपा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा