लेबल

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

भूतकाळातील अवघड जखमांचे विवेकी व्यवस्थापन

 “भूतकाळातील अवघड जखमांचे विवेकी व्यवस्थापन “

   ⏭ Self Depreciation of REBT

                      Dr Yojana Chirag,


“सारखे  आठवायचे ते अवघड स्पर्श, सगळ्या शरीरात कंप फुटायचा.

पाण्याखाली उभे राहायची लांब पळायला जायची रागारागात.मलाच माझी घाण वाटायची.

का असे झाले असेल? माझ्याच बरोबर का झाले? मी किती कमनशिबी? दुबळी लाचार,” चोवीस वर्षाची जान्हवी राग guilt hurt आणि आगतिक पने सांगत होती.


           प्रचंड ऍसिडिटी ज्यामुळे जवळ जवळ रोजच antacid ची टॅबलेट घ्यायला लागते, डोकेदुखी झोपेच्या तक्रारी आणि  periods irregular ह्या तक्रारी घेऊन जान्हवी मागच्या वर्षी  क्लिनिकला आली.


     नुकतीच बावीस-चोवीस वर्षे पुर्ण केलेल्या जान्हवी ची ब्लड ग्लुकोज लेवल  200 च्या पुढे जात होत्या आणि तिचा तेव्हा चा HbA1c level 6.9होती म्हणजेच ती diabetic patient होण्याच्या मार्गावर होती. म्हणजेच prediabetic होती.


     पहिले case taking हिस्टरी taking च्या session मध्ये जन्मल्या पासून आत्तापर्यंत ची संपूर्ण मानसिक शारीरिक हिस्टरी सांगायची आहे ह्याची व्यवस्थित कल्पना जान्हवी ला दिल्याने ती पहिल्याच case history taking session मध्ये जरा अवघडल्या सारखी च बसलेली मला जाणवली.

तिची बाकी सगळी शारीरिक माहिती घेऊन झाली.


     "मानसिक  हिस्टरी मध्ये तिला सगळं व्यक्त होता येईल असं वाटत नाही मॅडम"बोलली .

     मीही तिला थोडा वेळ देऊन बाकी lifestyle आहार व्यायाम आणि मानसिक ताणतणाव याविषयी आपण थोडे बोलू मग तुला वाटले तर  आपण आज बोलू नाहीतर पुढच्या  अपॉइंटमेंट ला बोलू असं तिला सांगितलं.


       Lifestyle वरची माहिती session झाल्यावर जान्हवी एकदम conscious होऊन सांगू लागली. मी आई सोडून जगात कोणालाही जे सांगितले नाही ते आज तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर बोलली.

     "मॅम अजूनही तो वाईट dangerous दिवस जसा च्या तसाआठवतोय. आई बाबा आठ दिवसासाठी  कोल्हापूर ला आमच्या गावी गेले होते मला prelim परीक्षा असल्याने मला मात्र मावशीकडे ठेवले होते.


    मॅम संध्याकाळी मावशी  भाजी आणायला गेल्यावर मी बारावीत असल्याने त्यात prelim परीक्षा चालू होती , म्हणून मी अगदी  मन लावून अभ्यास करत होते.


    अचानक" ..... अगदी  शरीर अकसून घेऊन  जान्हवी थरथरू लागली मी तिला जरा  पाणी प्यायला दिले त्यांनतर शांत झाल्यावर बोलली

  "मॅम मला कोणीतरी मागून प्रेस करत होते. मी घाबरून बघितले तर माझे काका होते. काही कळायच्या आत  माझ्या सर्व शरीर भर  त्यांचे अवघड स्पर्श होत होते. मला रडावं ,ओरडावं, पळावं कि मारावं काहीच कळालं नाही मी अगदी स्तब्ध..... पूर्ण शरीरातून जसा त्राण च गेलेलं"

    पाचच  मिनिटात माझी मावशी भाजी घेऊन आली आणि माझी सुटका झाली."

परत  एकदा दोनदा त्या विकृत माणसाने पुन्हा जवळ येण्याचा  प्रयत्न केला. मग  तर पुर्ण झोपच उडाली माझी.कशी बशी  तावडीतून सुटले पण भीती कायम.

    तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. माझे जीवन  च बदलले मॅम मी कुठेच  सुरक्षित  वाटत नाही. सारखे कोणीतरी आसपास आहे असे feel होते.

       मी हे आईला बरेच दिवस सांगू नाही शकले  आणि  जेव्हा आता धाडस झाले सांगायचे तर  आई ला आता ते प्रकरण काढून relation खराब नाही करायचे. परत नाही ना केले त्यांनी म्हणून सोडून दिले...... पण पण माझे काय मॅडम...

     माझे सगळे आयुष्यच बदलले उध्वस्त झाले त्या दिवसा पासून. मी कशी बशी prelim दिली आणि नंतर बारावीत ही मेन परीक्षेत खूप कमी मार्क्स मिळाले. हेच विचार यायचे  मनात सारखे सारखे.त्यामुळे अभ्यासचं नाही झाला .चांगले admission नाही झाले. आणि आयुष्याची सगळी दिशाच बदलली मॅम. IIT ची तयारी करून कशी बशी इंजिीअरिंग साध्य कॉलेज ला ही admission नाही मिळाले. शेवटी MBA केले पूर्ण लास्ट year". आता एका कंपनीत जॉब करते य.


   "सारखे  आठवायचे ते घाणेरडे स्पर्श, सगळ्या शरीरात कंप फुटायचा.

पाण्याखाली उभे राहायची लांब पळायला जायची रागारागात.मलाच माझी घाण वाटायची.

का असे झाले असेल? माझ्याच बरोबर का झाले? मी किती कमनशिबी? दुबळी लाचार,

      मी किती बिचारी, बाकी सगळे किती नॉर्मल आहेत माझ्याबरोबर असे झाले म्हणजे आता मी कधीच नॉर्मल नाही जगू शकणार. आणि कोणाला बोलुही शकत नाही. सगळे माझ्याशी  संबंध तोडतील. मला  कुत्ससीत नजरेने बघतील."

         असे बोलून जान्हवीचा बांध फुटला आणि क्षणार्धात ती जोरात रडू लागली. तिला काहीच सुचत नव्हते. मलाही क्षणभर  तिच्या अवस्थेचे वाईट च वाटले. पण तिला धीर देत सावरायला सांगितल.

     मी जान्हवी ला पुन्हा दोन दिवसांनी लगेच बोलावले  R E B T session साठी बोलावले जे actually stress management साठी दिले जाते.

      तिला मीत्या session मध्ये शांतपणे बऱ्याच महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या.

बरेच कन्सेप्ट क्लिअर केले. तरीही  अजून 4-5 असे session तिला घ्यायला लागले ज्यामुळे तिला ह्या प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्या तुन Mental trauma तुन बाहेर येता आले.

     

     मैत्रिणींनो तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल परंतु  या अशा आशया च्या म्हणजेच लहान पनी  मोठेपणी कधीतरी  असे अवघड प्रसंग सहन केलेल्या स्रिया चे प्रमाण जवळ जवळ  30-40% आहे माझ्या स्वतः च्या क्लिनिक मध्ये.

 प्रत्येक तिसरी चौथी case taking मध्ये असे नाजूक प्रसंग भोगलेली माझी कोणी एक मैत्रीण असतेच असतें. 

   इतके  प्रचंड मोठे प्रमाण आहे अशा childhood or मग नंतर च्या life मध्ये कुठे न कुठे कमी जास्त प्रमाणात हे असे त्रासदायक प्रसंग भोगलेले असतात.

कोणाला बस च्या ट्रेन च्या प्रवासा दरम्यान तर कोणाला नातेवाईकां कडून तर कोणाला कामाच्या ठिकाणी ऑफिस मध्ये.

     दाबलेल्या भावना, राग, स्वतः च्या आगतिक पणा ची कीव तिटकारा आणि मग एकंदरीत च  पुरुष घटकांबद्दलच तिरस्कार ह्या महिलांचा बाहेर पडतो. Express होतो व्यक्त होतो कुठून तर अनाकलनीय शारीरिक आजारातून जसे डायबेटिस ब्लड pressure, migrain, ऍसिडिटी, hormonal imbalance आणि असे अनेक किचकट आजार यांतून....

    यावर बोलण्या सारखे खूप आहे पण विषय ही मोठा आणि तितकाच गंभीर आहे,पण पोस्ट ची मर्यादा  बघता मी इथे ह्या अवघड विषया ची फार फोडाफोड dissection न करता फक्त उपयुक्त माहिती बघू.

    या अगोदर च्या सर्व पोस्ट मधून तुमच्या सुज्ञ वाचकांच्या एव्हाना लक्षात आले असेल कि माझा focus प्रॉब्लेम discuss करत बसण्याकडे नसून प्रॉब्लेम चे solution काढण्याकडे जास्त असतो. आणि solution काढून तुम्हाला डायरेक्ट अँक्शन प्लॅन देण्याचा मूळ उद्देश आहे ह्या लिखाणाचा.

    तसेच इथे कसे स्रिया चे आयुष्य हतबल आहे, कसे वर्षानुवर्षे स्रियांवर अन्याय होत गेलाय, कसे आपण पुरुषप्रधान संस्कृतीत राहतो किंव्हा घरी मुलींना कसे सुरक्षित environment नाही or मग पुढे जाऊन अगदी आपल्या देशात च देशातील लोकांच्या मानसिकते तच  कसा दोष आहे? हित पर्यंत आणि न संपणाऱ्या चर्चेत काही ठेवलेले नाही.

    

     R E B T rational emotive behavioural therapy आपल्याला शिकविते कि आपल्या विचाराचे आपल्या भावानांचे  व्यवस्थापन कसे करायचे.


    अखेर समजून घ्या मैत्रिणींनो त्रास दुसरे कोणी नाही देत घटना घडून गेली आहे आपणच आपल्याला छळत असतो. आपण म्हणजे आपल्या भावना आणि आपले विचार.

      त्यातील गुंत्यामुळे आपण त्रासात असतो ते व्यवस्थापन R E B T शिकविते.

        ज्या अगदी लहान मुली मुले ज्यांच्या सोबत असे काही घडते त्यांना seperate counselling session ची मनसोपचार तज्ज्ञ ची गरजच असतें.to take out the scar out from their system.

   मोठेपणी कळत्या वयात घडले आणि असा molestation चा त्रास जर काही insignificant व्यक्ती कडून महत्वाच्या नसलेल्या व्यक्ती कडून घडला तर तो व्यक्ती परत life मध्ये भेटला ही नाही किंवा भेटणार ही नसतो. अशा ठिकाणी. 

   आणि हा त्रास फक्त molestation आणि एक दोनदा च भोगावे लागले असेल. त्याहून जास्त त्रासदायक भयंकर शारीरिक मानसिक trauma बसलेला नसेल तर आपण आपल्या विचाराचे आणि भावांनाचे व्यवस्थापन नक्कीच करू शकतो आणि 

  ह्या विचित्र स्वतः ने च विनलेल्या जाळ्या तुन स्वतः ची सुटका नक्की च करू शकतो.

खात्री ठेवा 🙂

   

     आपण भावनिक वैचारिक हुशार व्हायचे य. वर्षानुवर्षे चालत ऐकत आलेल्या टिपिकल way ने विचार केला तर आपले मन इतके धुडगूस घालते कि जगणे मुश्किल होऊन जाईल. हे बरोबर का ते? हे समजू शकणार नाही आपण. मग  वाटेल आता जगणं शिक्षा आहे फक्त. यातून सुटका नाही. स्वतः च्याच अविवेकी भावना आणि विचारांनी मी स्वतःला JAIL मध्ये ठेवेल आयुष्यभर.

    म्हणून त्या धुडगूस घालणाऱ्या मनाला जरा शिस्त लावायची. त्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवायचे. विवेकी बुद्धीने त्याला training देऊन  शिकवायचे.

     हे वस्तावात इतकेच आहे आणि  ह्याचा एवढाच त्रास होईल आणि मी समंजस पणे परिस्थिती ची  घटंनांची कायमची शिकार म्हणून हतबल जगणे धुडकावून लावेल आणि स्वछंदी आनंदी जगायचा स्वीकार करेल.🙂🙂


         मग काय करायचे?

मी जान्हवीला काय समाजावले.तुम्हा सगळ्या वाचक मैत्रिणींना ही मी हा एक REBT फंडा or strategy देतेय नक्की उपयोग करा.

आपल्या आयुष्यात अशा त्रासदायक घटना experience जर घडले ज्यातून प्रचंड मानसिक त्रास होत असेल तर एकदा शांत बसून स्वतः ला विचारायचे.


After every traumatic experience Ihave a choice after a bad or negative experience just like Molestation.

प्रत्येक वाईट अशा प्रसंगा नंतर स्वतः ला एक चॉइस आहे.


मुलीच्या बायका मनात एक scar तयार होतो तो त्या पुढे पुढे नेत असतात.

तर At times I carry the entire experience forward

म्हणजेच घडलेल्या घटनेतून आपण काय काय पुढे नेतो.

पूर्ण च्या पूर्ण अनुभव पुढे न्यायचा? की


At times I carry the whole scene, situation, I carry the person or people , I carry the moments, I carry the day and I carry the EMOTIONS.....सगळं च्या सगळं मी carry करत असतें. पुढे पुढे.


At times I choose I wont carry the experience forward but I would only carry the LEARNING forward.


 LEARNING does not involve people does not involve situation, Does not involve EMOTIONS 🙂


        जे प्रॅक्टिकल आहे जे फॅक्टर within control आहेत ते सगळे करा help घ्या घरी सांगा प्रसंगी पोलीस case करा सगळं गरजेचे ते करा पण आता हे सगळं केल्यावर आता तुमच्या हातात काही आहे का?.... नाही... मग accept करा कि जर मी पुर्ण च्या पुर्ण अनुभव पुढे नेला तर जो व्यक्ती माझ्या life मध्ये अजिबात significant नाही महत्वाचा नाही त्याला शिव्या देत बसेल नावे ठेवत बसेल आणि situation पन्नास वेळा ते आठवून आठवून गिरवून परत परत खपली काढत बसेल.जखम चिघळत ठेवेल.

     आणि मनातला दुःख, guilt,राग, hurt, वेदना, अगतिकता सोबत नेईल.

      तर तसें न करता मी स्वतः ला विचारेल यातून मला काय LEARNING मिळाले. किती learning मिळतील?

2,3,4 मिळतील.

तर मी रोज सांगत बसेल बाजावेल स्वतःला till it becomes very very clear.


   जसे  जान्हवी च्या case मध्ये तिचे learning असतील

1)बाबा आणि भावा व्यतिरिक्त पुरुष घरात असताना शक्यतो एकटे थांबायचे नाही.थांबावे लागले तरी पुर्ण allert असेल.


2)आई ला लगेच सांगितले असतें तर पुढचे वाईट अनुभव थांबले असतें.


3)असा अनुभव आला तर ताबडतोब ओरडायचे गप्प बसायचे नाही. आणि


4)  स्वतः ला कमजोर ठेवायचे नाही शारीरित fittness पण माझा असा असेल कि स्वतः ची सुटका करून मी तिथून स्वतः ची सुटका करेल.


अशा learning मिळतील जान्हवीला.

हे जान्हवीला रोज रोज बाजवायला सांगितल्या. जोपर्यंत त्या पुर्ण आपल्या आत भिणल्या जात नाही.परत ती चूक होता कामा नये एवढी.


   त्या नंतर मी आजपासून मी माझ्या system मधून  त्या माणसाला बाहेर ठेवलं त्या situation ला माझ्या system मधून बाहेर ठेवलं, त्या भावनांना बाहेर ठेवलं

Learning मात्र मी सोडणार नाही कारण पुन्हा मी फसायला नको.


   आता I will keep that whole experience and person out of my system. आणि तो कप्पा पुर्ण च्या पुर्ण मी बंद करेल. विचार करत चघळत बसणार नाही. Learning मात्र बरोबर नेणार.

     परत सगळीकडे निवांत फिरेल बगडेल,नवीन मित्र बनवेल नातेवाईकांकडे राहायला जाईल मात्र ज्या ठिकाणी अडकले होते रिस्क निर्माण झाली होती तिथे मात्र मी अतिशय जागरूक राहील.खूप फर्म राहील आणि कसलेही लाड करणार नाही.learning सोडणार नाही


   बस झाले तर मग. घडलेल्या घटना आणि scar घेऊन किती काळ मी मिरवत बसणार आणि त्यामुळे सारखी सारखी किती घायाळ होत राहणार तर नाही.

कुठलाही वाईट अनुभव काहीतरी शिकावीन्या साठी घडतो मी त्यातलं learning मी घेईल आणि पुढे जाईल. परत मुर्खा सारखी तीच चूक करणार मात्र नाही. झालं असं हुशार व्हायचं.तेही without carrying emotional garbage inside me. 🙂


मग स्वतः ला नीट एकदाच समजावून बाजावून सांगायचं कि असे वाईट स्पर्श, नजरा घटना ह्या अतिशय insiignificant आहेत. क्षणिक आहेत त्यानां कसलेही अस्तित्व नाहीये. मी उगाळून उगाळून त्यांना महत्व देतेय. अन्यथा ते होऊन संपून गेलेत तेव्हाच. कुठेही शिल्लक नाहीयेत except my memory. जे मी वारंवार वारंवार आठवून त्याला अमूर्त स्थान तिले आहे.

        जर मी असे वर सांगितल्या प्रमाणे मनाला training दिले तर. Learning घेऊन मी situation, person आणि emotion माझ्या system मधून कायमचा बाहेर काढेल.

  जसे मैत्रिणींनो मोबाईल फोन यायच्या आधी सगळ्या चें मोबाईल no आपले तोंडपाठ होते. OVER THE PERIOD जसा जसा मोबाईल वर्षे भर वापरू लागलो तसें आपल्या brain च्या system मधून  सगळे मोबाईल नंबर vanish झाले.आणि आपला आणि जास्तीत जास्त नवऱ्याचा मोबाईल नंबर पाठ असतो बाकी कुठलाच नंबर आपला पाठ नाही अगदी तसें.

     आपण brain ला आता नंबर सांगायला लावत नाही तो विसरला. तसेचlearning बरोबर घेऊन प्रसंग परत परत उगळायाचे बंद केले तर आपोआप आपल्या system मधून कचरा साफ होतो. ONCE and FOR ALL 🙂🙂🙂


हे जमते.

मी माझ्या मागील 20वर्षा च्या प्रदीर्घ प्रॅक्टिस मध्ये मी स्वतः कित्येक patient चे होताना त्यांना जमाताना अनुभवलेय. So खात्रीने सांगते.


जान्हवी ला ही जमले चांगलेच तिच्या system मधून तो प्रसंग पुर्ण पणे काढायला त्यासोबत आयुष्य भर पुरेल असे काही learning घेऊन जान्हवी पुढच्या सुंदर प्रवासाला तयार झालीये.

पुढच्या month मध्ये california ला job साठी 2-3वर्षे कालावधी साठी निघाली आhe🙂

तिच्या personality नुसार निघालेलेअतिशय प्रभावी होमोओपॅथीक तिला चांगलेच लागू झाले. त्यासोबत दिलेले डाएट lifestyle change आणि व्यायाम या सगळ्याचा एकंदरीत परिणाम स्वरूप ट्रीटमेंट च्या बरोबर एक वर्षानी तिची शुगर hba1c 5.5 म्हणजेच नॉर्मल आलीये periods ऍसिडिटी आणि migrain पुर्ण आटोक्यात आलेले आहेत.

पुढच्या काही महिन्याचे मेडिसिन तिच्या बरोबर परदेशात नेण्यासाठी ती आज आली होती

पुर्ण फ्रेश आनंदी आणि full of spirit जगण्याची चेतना zeal भरलीये आता तिच्यात ☺️


आशा आहे हा अतिशय नाजूक तितकाच गंभीर विषय मला इथे पोस्ट च्या मर्यादेत राहून हाताळता आला असेल.

अजून बरंच करण्या सारखे आहे REBT through पण एक strategy मी आज इथे तुम्हाला शिकविली.

तुम्हाला मदत होती आहे असे वाटल्यास नक्की कळवा.


धन्यवाद 🙏

डॉ योजना चिराग,


Dr . Yojana Chirag,

PG Classical Homoeopathy,

Sp REBT psychology.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा