संस्कार
----------
स्त्रीवर आईपणाचा संस्कार वाहत आहे तिच्या नसानसातून..
तिच्या स्तन आणि योनीतल्या स्त्रावां इतकाच.
तिच्या माणूसपणाच्या जाणीवा तर इतक्या नव्या की,
आईपणा cha च विजय होतो, कित्येक वेळेस,
आणि मग कापले जातात तिच्या स्वप्नांचे पंख
कधी तिच्याच कडून तर कधी स्वकीय कडून
किंवा तिचं आडव्या करते तिच्या यशाच्या शिड्या
साऱ्या कुटुंबाची आई होण्यासाठी..
झालेले अन्याय पचवत राहते बाई,
घरट सांभाळण्याचे संस्कार वाहत आपल्या उरातून,
झुंज देत राहते आतल्या बाहेरच्या वादळांना,
पिलांना आपल्या कुशीत घेऊन..
किंवा कधी माणूस जागा झालाच तिच्यात कधी,
आणि तिचे स्वातंत्र्य हक्काने घेऊ पाहिलं तिने,
काटेरी वाटेवर , पावलोपावली संस्कारांचे चश्मे पहात च असतात वाट,
तिच्या वाट चुकण्याची..
तिच्यावर संस्कार कमी पडले म्हणण्यासाठी..
बाईपणाचे संस्कार ठरतात तिच्या अस्तित्वाचे कारण..
जेव्हा केली जाते सामाजिक जाहिरात
'मुलगी नसेल तर मिळेल का आई, बहीण आणि बाई'..?
- रुपाली कुलकर्णी.
माणूस बनु पाहणारी बाई..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा