दीन वेदनांच्या वेदीवरती,
दूरस्थ सुखांच्या दूलया पांघरती;
तर भाजण्या भाकर्या बाहुबली,
कुणा पेटवती सरणावरती.....
कधी गाडावे मातीत स्वतःशी,
तेव्हा आशेचे अंकुर फुटती;
जसा बंदिस्त होतो थेंबही कधी,
जन्म मौक्तिकाचा लेण्यासाठी.....
झगडते सुरवंटही सोशिकपणे,
काया सुंदर लेण्यासाठी तर;
उभा जन्म जळते समई,
तम राऊळीचा मिटवण्यासाठी.....
अंधाराचाच गर्भही हवा,
नवप्रकाशकिरण जन्मण्यासाठी;
अन् आवर्तनेच पुरतील वेदनांची,
पूनः संवेदना चेतवण्यासाठी,
पूनः संवेदना चेतवण्यासाठी.....
@अर्चना खिस्ती-गोरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा