जखमा
-----------
जखमा कितीक उराशी मी बाळगून आहे,
अस्वस्थ अश्वत्थामा सदैव सोबतीस आहे
कोणी नजरेनी मज घायाळ करून गेले,
नजरेत कैद माझे जखमी हृदय होते..
शब्दांचे बाण कधी वर्मी लागले होते,
घाव भरले तरीही व्रण सोडून गेले होते..
निरोप लाडक्यांचा घेणे वळणावर भाग होते..
विरहात व्याकूळ मात्र मन जखमी झाले होते..
अनवाणी भटकत होती भर उन्हात कोवळी पोरे,
चटके अनाथ तळव्यांना, जीव जखमी करून गेले.
जखमा कशा कुठे मी लपवू झोळीत माझ्या,
फाटक्या झोळीतून अश्रू ओंजळभर सांडले च होते..
-रुपाली सागडे कुलकर्णी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा