"नुस्ते नुस्ते नभ निळे सकाळ सरून
नुस्ता तरी पक्षी बसे झाडात शिरून.."
आरती प्रभूंच्या कवितेचं सलील कुलकर्णी यांनी केलेलं हे गाणं ऎकलं तेव्हापासून तो निळा रंग काही मनातून जात नव्हता..
वास्तविक निळा रंग जीव निववणारा, शांत करणारा..पण आरती प्रभूंच्या या कवितेतल्या निळ्या रंगातली अस्वस्थता तुमच्या मनाचा पूर्ण ताबा घेते. असण्या नसण्याच्या सीमारेषेवरची ही घालमेल किती जीवघेणी असते !! सगळं काही समोर आहे असं वाटत असताना आपल्यापुढे मात्र एक अदृश्य भिंत कधी उभी राहते ते कळत नाही. झाडात शिरलेल्या पक्ष्यासारखं मन स्वतःच्याच कोशात गुडूप होऊन जातं..
सलीलने ही घालमेल, अस्वस्थता फार सुंदर पकडली आहे..
ते गाणं ऐकल्यावर कागदावर जे काही उमटलं ते हे..
सोबत सलील कुलकर्णी यांच्या गाण्याची लिंक दिली आहे.
https://youtu.be/uWBG9KVQLwA
अदिती जोगळेकर-हर्डीकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा