💐पालक मेळाव्याच्या निमित्ताने💐
आपल्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत कालपासून पालक मेळाव्यास सुरुवात झाली . शाळेने पालक अभिव्यक्ती गट तयार करून पालकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले.त्याबद्दल शाळेला तसेच नियोजनासाठी राबणारे संयोजक सर्वांना खूप खूप . 🙏
आज दिनांक 10 एप्रिल 2022, रविवार च्या अभिव्यक्ती मेळाव्यात मला सहभागी होता आले . पालकांच्या सोईसाठी शनिवार रविवार हे दोन सुट्टीचे दिवसांचे नियोजन खूपच छान .
आजच्या मेळाव्याचे मी काही अनुभव इथे व्यक्त करू इच्छिते .
आपण सर्वजण वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणारे , प्रत्येकाचे कामाचे स्वरूप भिन्न, एकमेकांचा पुरेसा परिचयही नाही, पण आपल्या पाल्याच्या शाळेत असा एखादा गट कार्यरत होत आहे . ज्याद्वारे पालक एकत्र येऊन चर्चा करताहेत, स्वतः च्या अभिव्यक्ती सादर करताहेत ही बाब नवीनच , आणि हा अनुभव घेण्याची संधी प्रशालेच्या माध्यमातून मिळाली .
सुटीच्या दिवशी अनेकदा वेगवेगळे कार्यक्रम आपण अरेंज करतो, त्यात सहभागी होतो, पण असा एखादा कार्यक्रम की ज्यात स्वतःला व्यक्त होण्याची ,स्वतःला अभिव्यक्त करण्याची संधी मिळते आणि तिही कोणत्याही स्पर्धेशिवाय ही एकच बाब मला या मेळाव्यात सहभागी होण्यास कारणीभूत ठरली. स्पर्धा नाही,कोणतीही चढाओढ नाही,केवळ स्वतःसाठी,दिलेला हा बहुमूल्य वेळ खूप ऊर्जा देऊन गेला.
आल्यावर दोन विषय मिळाले .ऐनवेळी एखाद्या विषयवार सुचेल ते लिहिण्यात खरी मजा होती.बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन लिहिल्याचा आनंद मिळाला. खूप शांत नि प्रसन्न वाटले . त्यानंतर अभिवाचन गटात सहभागी होता आले . पालक गटासमोरच्या अभिवाचनामुळे उत्साह वाटला . खूप दिवसांनी अभिव्यक्त झाल्यामुळे मनाची मरगळ झटकून गेली . अनेकांची सादरीकरण ऐकलायला मिळाली . कविता मनाला स्पर्शुन गेल्या .
प्रांजलदादा ने सर्व पालकांचे कौतुक केले .अमेय दादाने मागदर्शन केले त्यामुळे सादरीकरणाच्या खुबी समजल्या. आसावरी ताई चे नियोजन छान, ओंकारदादा सर्वांचेच आभार मानावेत तेवढे कमी आहे .
या मेळाव्याच्या दोन माळा गुंफल्या गेल्या . पुढील दोन आठवडे त त्या अशाच सुंदर पद्धतीने गुंफतील. जास्तीत जास्त पालकांचा सहभाग वाढून हा मेळावा यशस्वी होईल यात शंकाच नाही .
माझी संयोजकांना विनंती आहे .
अजून बऱ्याच पालकांना या पालक गटाबदद्ल पुरेशी कल्पना नाहीए. प्रत्येक वर्गाच्या पालक गटावर पुन्हा एकदा याची कल्पना दिली तर जास्तीत जास्त पालक सहभागी होतिल🙏
धन्यवाद
सौ . शिल्पा जरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा