लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

ऋतुचक्र

 ऋतुचक्र

सुगंधी पुष्पे आणि पर्णांची नवी - नव्हाळी

वसंत आगमनी गाई कोकिळा सकाळी - सकाळी।

ग्रिष्माची जरी तप्त झळाळी

सोबतीला असे आमरस आणि शहाळी ।

पुलकित करी वर्षाराणी सावळी

दामिनी संगे बरसे घननिळी ।

शरदाचे शितल चांदणे आभाळी

कोजागिरीला साथ देई मनमोकळी।

मकर संक्रांतीला म्हणे आई काळी

हेमंत हीच कृषिवलांची दिवाळी ।

शिशिराची हुडहुडी आगळी

शुष्क पर्णांची ही तर सोनसाखळी।

असे हे सहा ऋतू भारतभुवनी

प्रत्येकाची शोभा निराळी।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा