लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

स्वप्न पाहुनी नवे, रंगून जाऊ रंगात,

 स्वप्न पाहुनी नवे, रंगून जाऊ रंगात,

स्वप्नातच माझ्या कल्पना भन्नाट,

उद्याचा सूर्योदय पाहुयात सिडनीत

दुपारी जेवण करू मलेशियात,

तर रात्रीचे जेवण मात्र आपल्याच घरात,

स्वप्नच ते त्याला काय सीमा,

आता वाटतो मला माझाच स्वप्नांचा हेवा, 

मोदींना भेटण्याची इच्छा मनात आहे माझ्या,

पण त्यांना नाही वेळ स्वप्नात येण्या माझ्या,

काय करू स्वप्नातच कल्पना सुचतात साऱ्या,

एकाच दिवसात फिरून येऊ जग सारे,

मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणतात हे सारे,

मनात हिंदोळ्यावर स्वप्नांचे वाहते वारे 

स्वप्नांच्या दुनियेत काहीही करा होणारच सगळे पूर्ण

ही गंमत स्वप्नांची, कधी होणार सुफळ संपूर्ण,

स्वप्न पाहूया मोठी मोठी,

करूयात पूर्ण स्वतः साठी, 

स्वप्नाला नाही सीमा, नाही कोणती परिभाषा

पंख नवे लावून, उडण्याची मला आशा,

नवं वर्ष घेऊन येणार नव्या नव्या गोष्टी,

स्वागत करुनी आनंदाने, करूया थोडी मस्ती

नवीन वर्षाच्या स्वागता , सज्ज जाहले, 

२०२२ च्या आठवणीत रमले आता सारे

Happy New Year!💐

©kkdhanashree

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा