खरंच झोका, झोळी, पाळणा, हिंदोळा, झोपाळा किंवा चोपाळा, तूच माझा श्वास आहेस.
नाव तुझी अनेक, रुप अनेक, जमिनीवरून क्षणात आकाशात गेल्याचा हा भास आहेस
सदैव तत्पर तू सगळ्यांना सामावून घ्यायला..
एका क्षणात तयार वेगळ जग दाखवायला
आकाशात नेलं तरीही पाठीशी राहणारा
जमिनीवर येताच पाय खाली टेकायला लावणारा
सदा हसून म्हणतोस की जो समजतो मला,
त्याला मी आयुष्याचा भरभरून आनंद दिला
आणि जर वेगळी चेष्टा चुकून सुचली कोणाला
तर वेळ न घालवता क्षणार्धात जमिनीवर लोळवतो त्याला
पटलं मला तुझं सगळं म्हणणं, तूच माझा खरा गुरू
तुझ्या आशीर्वादाने आयुष्यातल्या नवीन यशस्वी पर्वाची सुरुवात करू
🙏🏻🙏🏻🙏🏻
© हर्षाली वाघोले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा