अविस्मरणीय गणेशोत्सव २०२३
२०२२ ची ज्ञान प्रबोधिनी ची गणपती विसर्जन मिरवणुकी ठीक ९ वाजता सुरू झाली होती...मला आणि माधवीला विश्रामबाग वाड्यापाशी पोहोचायला...अमंगळ उशीर झाला.... मिरवणूक जोंधळे चौकाजवळ आल्यानंतर काही पालक मातानी उस्फुर्त पणे नृत्याला सुरूवात..माधवी ने काही वेळ विचार केला पण तिला काही चैन पडेना... आणि ती देखील त्या गट मधे नृत्य करायला लागली..... मिरवणूक संपली...रेगुलर आयुष सूरू झाले...
२०२३ मधे ८ वी मुलींना कलरीपयट्टु हा प्रकार निश्चित झाला...व मुलींची तयारी सुरु झाली... माता पालकांनी बर्ची नृत्य करायचे अशी गटावर सूचना मिळाली आणि माधवी घरामध्ये सांगुन टाकले की ती गटामधे भाग घेणार हे सांगुन टाकले...आमच्या घरचा art director च जर सरावा मधे व्यस्त रहाणार म्हणजेच घरातील गणपती तयारी लवकर सुरवात करावी लागणार हे नक्कीच होते....सुरूवात कोठे करायची...तर गौरीचा पितळी मुखवटा खुपचं जुना झाला होता...तो आता बदलणे आवश्यक झाले होते....१५ ऑगस्टच्या मटा च्या पुरवणी मधे.. सह्याद्री उद्योग ची मुखवट्या ची ad आली होती. पुण्याच्या उपनगर कात्रज येथे रहायला येवून ३० वर्षे झाली असल्यामळे गावात कुठलीही खरेदी करण्याचा कंटाळा येतो.... परंतु ह्या वर्षी गौरी मुखवट्या निमित्ताने सह्याद्री उद्योग घ्या शुक्रवारातील... कारखान्यात Google map घ्या आधारे शोधत गेलो...तिथे गेल्यावर गौरीचे फायबर मधील मुखवटे पाहीले...त्या मुखवट्या च्या चेहर्यावरील तेज , डोळे पाहून तसा मुखवटा घ्यायचा हे निश्चित झाले....मालकांना किंमत विचारली तर त्यांनी जरा जास्तच किंमत सांगितली...त्यांना नंतर येतो सांगून तेथून निघालो.. मधल्या काळामध्ये रक्षाबंधन आल्या वर बहीणींकरीता काही मिळते आहे ते पहायला तुळशीबागेत रमा बरोबर जाणे झाले...तेव्हा तिथे गौरीचे तसेच मुखवटे मिळत आहे हे दिसले.....मग काय पुढच्या शनिवारी आमची स्वारी परत माधवी बरोबर तुळशीबागेत धडकली..... तुळशीबागेत जायचे म्हणजे सवारी कुठे लावायची हया एका मोठा प्रश्नाचे उत्तर आधी शोधूनच घराबाहेर पडावे लागते....शनिवार पारापाशी रमेश डांईग घ्या बाजुला गेलो की जागा मिळते हे मागच्या वेळी लक्षात आले होते.... त्यामुळे तो प्रश्न ही सुटला होता... आम्ही दोघेजण तुळशीबागेत धडकलो....तसे पाहिले तर महिलांबरोबर तुळशी बागेत जायचे म्हणजे सामान्यतः पुरुष वर्गाला शिक्षा केल्यासारखे फिलिंग येते...तुमचे तुम्ही जा आणि खरेदी करा असेच सगळे जण सांगत असणार हे मात्र नक्की....तर तुळशीबागेत गेलो...गौरीचे मुखवटे पहायला सुरूवात केली...आवडायला लागले परंतू प्रत्येक दुकानातील मुखवट्यामधे मजा काही येत नव्हती...शेवटी एका दुकानात मुखवटा आवडला, bargaining झाले व त्याची खरेदी झाला....आजकाल आमच्यादोघांच्या नोकरी मुळे खरेदी करायला एकत्र वेळमिळणे अवघड झाले आहे..
आता पुढचा टप्पा होता बोहरी आळी...तुळशी बागेत कडे जातानाच abc कडे जाणारया रस्त्यावर गाड्यांची गर्दी पाहिली होती..माधवी ला विचारले परत शनिपारा पाशी जायचे सवारी काढायची , गर्दी तुन वाट काढत बोहरी आळी तर जायचे त्यापेक्षा पायीच जायचे का....होकार मिळताच आधी मंडई नंतर नेहरु चौक रस्त्याने बोहरी आळी कडे मार्गक्रमण केले..जाताना सजवटीच्या च्या साहित्याची चौकशी , गौरी आवाहन करीता फराळ मांडण्याच्या डिश ची खरेदी झाली....बोहरी आळी मध्ये एकाच दुकानात सर्व सामान खरेदी केले व परत शनिपारापाशी आलो व गाडीने घरी आलो...घरी आल्यावर एक वेगळेच संकट उभे राहिले होते... आधी च्या तुळशीबागेतील फेरी मुळे रमाचे डोळे आले होते... आणि आता माधवी ने रात्री झोपताना मलाही डोळ्यांना त्रास होतो आहे असे सांगितले....आता माय लेकीला बेडरुम मधे quarantine करावे लागले...२०२१ मधील कोरोन्याच्या काळातील quaintine ची आठवण जाग्या झाल्या..कोणी कितीही म्हणोत...घरातील होम मिनिस्टर आजारी पडल्यावर सर्व पुरुष वर्गाची तारांबळ तर होतेच....आमच्या कडे आई असल्यामुळे मात्र तेवढा परिणाम होत नाही..... यथावकाश पुढील आठवड्यामध्ये दोघी बर्या झाल्या...
आता गणपती बाप्पा ची मुर्ती कोठून घ्यायची हाविचार सुरु झाला... गेल्यावर्षी बहिणीने मुर्ती बनवून दिली होती परंतु तिची कन्या छोटी असल्याकारणाने तीने नक्की नाही असे सांगितले..शाळेत तुन मुर्ती घ्यायचा विचार केला पण मागेएकदा सहकार नगर मधून शाडुची मुर्ती घरी नेताना घरापाशी बाईक वरून उतरताना त्याचाहात मोडल्याच्या आठवणी ज्याग्या झाल्या...शाळेतून मुर्ती घेतली तर कारनेच न्यायची हे नक्की केले.. तेवढ्यात बहिणीने आम्ही मुर्त्या विकत आहोत आणि त्याचे फोटो माधवीला पाठवून दिले...what's app ने हे मात्र काम नक्कीच चांगले केले... भ्रमणध्वनी वरच आपल्याला फोटो मधुन काय आवडते आहे हे ठरवता येते... यथावकाश मुर्ती पाहुन फायनल केली..आता रमा हाताशी आल्यामुळे माधवी वर अवलंबून रहावे लागत नाही... त्याबद्दल माधवी ने बोलून देखील दाखवले..तुमची मजा आहे आता...मी नसले की तुमचे काही अडत नाही आता..रमा आहेच...
रमाचा शाळेत सराव सुरू झाला..आता माधवी देखील शनिवारी सरावाला जायलालागली....मातापालकाना ताई बर्ची शिकवत होत्या परंतु घरी एक शिक्षक आधीच तयार झालेला होता...रात्री सगळे आवरले की माघवी सराव करायची रमा(बाई)...ती च्या चुका काढणे..त्या दुरुस्त करणे...हे सूरु झाले होते...त्यातच गणपतीचे पदार्थ तयार करणे चालू होते....वडील पालकांच्या बर्ची घंटा बद्दल ऐकले पण सराव मंगळवार व गुरूवार आहे कळल्यावर त्याचा विचार करणे शक्यच नव्हते....आता मात्र मला fomo आयला लागला....मायलेकी भाग घेत आहेत आणि आपण कोणत्याही प्रकारामध्ये भाग घेत नाही जाणवले....त्यातच पालक अभिव्यक्ती गटाला ५ ते ७ गटाकरीता शाळेकडून निमंत्रण मिळाले...आसावरी ताईंनी तुम्ही इच्छूक आहात असे विचारले...
कार्यक्रम ची तारीख कळली २५ सप्टेंबर...आता आली का पंचाईत...आमचे release २९ तारखेला ठरले होते....IT मधील सर्वाना release म्हणजे धडकी भरवणारा प्रकार माहित असेलच...बाकीच्या करीता, त्या दिवसांपर्यंत ठरलेले काम (project) पुर्ण करावे लागतात...नाहीतर client ला ते काम पुढील release शिवाय देता येत नाही आणि सर्व client लवकर द्या म्हणून मागे लागलेले असतात..
तरीही काही तरी मार्ग काढून गायन गटाच्या सरावाला जायला सुरुवात केली...ह्याच चे श्रेय आसावरी ताईना..त्यांनी push केले नसते तर हा अनुभव घेता आला नसता...शाळेत (१९९२ साली) असताना एका नाटका मधे २ मिनिटांची भुमिका केली होती त्यांतल डायरेक्टर २०२३च... अभिव्यक्ती मधे सराव करताना खुपचं मजा आली.. किल्ले गटा व्यतिरीत नवीन मित्र मिळाले... शाळेतील आनंद भुतकर हा मित्र मिळाला गायन गटा बरोबर गायनाचा पहिलाच अनुभव घेता आला....गणपती बाप्पाचे आगमन झाले... ह्या वर्षी गौरी आणि गणपती विसर्जनच्या दिवशी पाऊस चालू होता...शेवटी कारने बाप्पा ची मूर्ती घेऊन गेलो.. मागील काही वर्षे मूर्ती विसर्जित न करता दान करतो... पर्यावरणा करीता आमचा खारीचा वाट...
२५ तारखेचा कार्यक्रम छान झाला.. आणि विसर्जन चा दिवस आला देखील... ऑफिस मध्ये पुर्ण सुट्टी दिवस टाकलेली परंतु कामा मुळे दुपारी २ नंतर login करायचे ठरले...ह्या वेळी माधवी आणि रमा उत्तर पुजे करीता लवकर गेल्या, मी थोडाउशीरा ८.३० वा शाळेत पाशी गेलो तर ताई दादा ढोल घेवून चालले...मी देखील विश्रामबागवाडा कडे गेलो...अजय घाणेकर ला सुट्टी नव्हती, त्याला दोन तास वेळ काढयला सांगितले होते परंतु येणार की नाही हे काही कळले नाही...ह्या वर्षी सासरे, सासुबाई, मेहणा, त्याची बायको, मुले, आई , बाबा व आत्या देखील आल्या होत्या..बरोबर ९.३० वाजता ध्वज वंदन झाले...व ढोल ताशाच्या आवाजामधे मिरवणूक सूरू झाली....सर्व जणांनी त्याच्या तालावर ठेका धरला...ह्या लक्ष वेळेस विशेष कौतुक माता पालकांचे, घरचे सगळे मार्गी लावुन गटा मधे सहभाग घेणे व न दमता थकता.दोन तास बर्ची करणे खुपचं अवघड आहे.... घाणेकर उभयता मिरवणूक मधे आलेले पाहून आनंद झाला...ह्या वर्षी मिरवणुक शेवटचे मातापालक गट ते पुढील वडिल पालक गटा पर्यंत पाहीले..२ तासानी जोंधळे चौकामध्ये बाप्पा चे विसर्जन झाले आणि मला वेध लागले घरी जाऊन release चे काम करण्याचे...यथावकाश शूक्रवारी २९ तारखेला release चे काम रात्री ९.४५ संपले..आणि गणेशोत्सव २०२३ व ऑफिस मधील release चा समारोप, पुढील वर्षी बर्ची नृत्य गटामध्ये भाग घ्यायचा हे ठरवून झाला.....
गणपती बाप्पा मोरया, पुढील वर्षी लवकर या....
सचिन चव्हाण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा